spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्वच्छता पंधरवड्यानिमित्त पीएमश्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा चाचेर येथे विविध उपक्रम उत्साहात

किशोर साहू, मौदा :- स्वच्छता पंधरवड्याच्या अनुषंगाने पीएमश्री जि.प. उच्च प्राथमिक शाळा चाचेर येथे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य व सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.

कार्यक्रमांतर्गत स्वच्छता शपथ व स्वच्छता जनजागृती दिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, घोषवाक्य लेखन, चित्रकला, वक्तृत्व, वक्तृत्व प्रश्नमंजुषा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे मांडला.

तसेच आरोग्यवर्धिनी उपकेंद्र, चाचेर येथे विद्यार्थ्यांनी भेट देऊन आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली. आयुर्वेद दिनानिमित्त आरोग्य अधिकारी धुर्वे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य, आयुर्वेदिक जीवनशैली व निरोगी जीवनाबाबत मार्गदर्शन केले. यानंतर विद्यार्थ्यांनी परिसर भेट देऊन स्वच्छतेची पाहणी केली तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती केली.

बालसभेचे आयोजन करून विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली.

या संपूर्ण उपक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जीवन सहारे, उपाध्यक्ष शुभांगी आंबीलडुके, मुख्याध्यापक अनिल गडपायले, पदवीधर शिक्षक रविंद्र घुगे,परविन शेख, भारती साखरकर, प्रीती खंगार, संगीता बालकोटे, उकुड्डे ,रुचीला खंडाईत व नेहा निमजे यांचा सक्रिय सहभाग व मार्गदर्शन लाभले.

“स्वच्छ शाळा, सुंदर शाळा, निरोगी विद्यार्थी आणि स्वच्छ परिसर” हा संदेश देत स्वच्छता पंधरवड्यातील विविध उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडले.

Popular Articles