spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जयभीम चौकात वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावला ऑटोचालक!

– ऑटोचालकासह तीन महिला प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल; शासकीय कामात अडथळा

संदीप कांबळे,कामठी :- वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीदरम्यान ऑटो थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर न थांबता पुढे निघून गेलेल्या ऑटोचालकाला पाठलाग करून थांबविले असता, त्याने वाहतूक पोलिसाच्या अंगावर धाव घेतल्याची घटना काल सायंकाळी 5 दरम्यान कामठीतील जयभीम चौक, कळमना रोड येथे घडली. या वेळी ऑटोमधील तीन महिला प्रवाशांनीही पोलिसांशी हुज्जत घातला, याप्रकरणी नवीन कामठी पोलिस ठाण्यात ऑटोचालकासह तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वाहतूक पोलीस हवालदार रवींद्र प्रल्हाद भंगाळे (वय ४३) हे वाहतूक विभाग, कामठी येथे कार्यरत आहेत. २३ ऑक्टोबर रोजी ते प्रवासी वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी रनाळा-कळमना रोड परिसरात कर्तव्यावर होते. सायंकाळी ५.४९ वाजताच्या सुमारास एमएच-४९-ई-०९७३ क्रमांकाच्या ऑटोला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र, चालकाने ऑटो न थांबविता पुढे नेला.

त्यानंतर पोलीस हवालदार भंगाळे यांनी खासगी वाहनाने पाठलाग करून जयभीम चौकात ऑटो थांबविला. यावेळी ऑटोचालकाने वाहन पोलिसांच्या दिशेने आणून खाली उतरल्यावर त्यांच्या अंगावर धाव घेतली तसेच ऑटोमधील तीन महिला प्रवाशांनीही पोलिसांच्या अंगावर धाव घेतली.तर

या झटापटीदरम्यान पोलीस हवालदारांची नेमप्लेट तुटून खाली पडली. त्यानंतर ऑटोचालक वाहनासह घटनास्थळावरून निघून गेला शासकीय कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी पोलीस हवालदार रवींद्र भंगाळे यांच्या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, २२३ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १७७ नुसार ऑटोचालक आणि तीन महिला प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत.

Popular Articles