हंसराज,भंडारा :- नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. अश्विनी भोंडेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर भोंडेकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन केले होते.
भोंडेकर यांनी सांगितले की, केवळ पदवीची डिग्री घेऊन थांबण्यापेक्षा सर्व पदवीधरांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन आपला मतदानाचा हक्क बजावावा. महायुतीमध्ये काही ठिकाणी दावे-प्रतिदावे होत असले, तरी त्याचा महायुतीच्या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.








