– नागरीकांनो..आगीपासुन जंगल संरक्षणाकरीता सहकार्य करा – टुले
सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- आगामी काळात ऋतुमानात होणाऱ्या बदलामुळे जंगलामध्ये आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आगीपासुन जंगलाचे संरक्षण कसे होईल या अनुषंगाने वनपरिक्षेत्र देवलापार (प्रादेशिक) कार्यालयात नुकतेच आग प्रतिबंधात्मक उपाययोजना चर्चासत्र व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते. वनपरीक्षेत्र देवलापार ( प्रादेशिक) चे वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव भाडुराव टुले यांनी ‘ नागरीकांनो..आगीपासुन जंगल संरक्षणाकरीता सहकार्य करा ‘ असे आवाहन राजकीय मंडळी व नागरिकांना केले. चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणुन माजी जि. प. सदस्य शांता कुमरे, कल्पना भलावी सरपंच बांन्दा, मुकेश दुबे सरपंच गट. ग्रा. वडांम्बा, वनिता टेकाम सरपंच गट ग्राम. कट्टा, उपेश उईके सरपंच गट ग्राम. डोंगरताल, स्नेहा भांडारकर सरपंच गट ग्राम. बेलदा, शिला वरठी पोलिस पाटील पिंडकापार, इंद्रकूमार कुंमरे संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष, मदन आलोकार सदस्य गट ग्रामपंचायत वडांम्बा, स्वप्निल बोपटे पोलिस पाटील छवारी, धनराज सलामे पोलिस पाटील टुय्यापार, वनपरिक्षेतील ए. व्ही. जनवार क्षेत्र सहाय्यक देवलापार, पी. टी. मेश्राम क्षेत्र सहाय्यक पिंडकापार, आर. आर. डोंगरे क्षेत्र सहाय्यक करवाही, के. के. सोनकुसळ क्षेत्र सहाय्यक मानेगांव आदीसह वनपरीक्षेत्रांतर्गत गावातील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ संयुक्त वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष, सचिव, प्रतिष्ठित नागरिक व माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक, वनमजूर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक जि.एफ. लुचे सहाय्यक वनसंरक्षक (जंकास-१) रामटेक, अविनाश लोंढे मानद वन्यजीव रक्षक, एस. बी. टुले वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार (प्रादेशिक ) यांनी शेती व जंगल यांचा संबंध कशाप्रकारे आहे याबाबत सखोल मार्गदर्शन करुन जंगलाचे आगीपासुन संरक्षण करणे का आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले. निसर्गा मध्ये होणारे परिणाम व मनुष्य वस्तिकडे प्राणी येवून ” मानवी वन्यजीव संघर्ष उद्भवत असल्याने आग नियंत्रणा करीता गाव पातळीवर नियोजन करुन त्या आग प्रतिबंधात्मक उपयोजनेकरीता व ग्रामस्थांचे पथक तयार करणे करीता नियोजन करणे बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व प्रास्ताविक पी. टी. मेश्राम क्षेत्र सहा. पिंडकापार यांनी केले. आभार प्रदर्शन कोमल राडुत वनरक्षक द. जुनेवानी बिट यांनी केले.