– मनपाच्या विशेष सभेत निवड झालेल्या सदस्यांची महापौरांनी केली घोषणा
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेमध्ये स्थायी समितीतील १६ सदस्य, परिवहन समितीचे १२ व दहा विषय समित्यांमध्ये सदस्यांची (ता. २४) निवड करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेची विशेष सभा रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर निता ठाकरे होत्या. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी व निगम सचिव डॉ. रंजना लाडे उपस्थित होते.
महापौर निता ठाकरे यांनी स्थायी समितीमध्ये १६ सदस्यांची निवड करण्याच्या प्रस्तावाचे वाचन केले व सभागृहातील पक्षीय बलाबल अनुसार गटनेत्यांनी सदस्यांची नावे बंद लिफाफ्यात द्यावी, अशी विनंती केली. त्यानुसार सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर व मुस्लिम बहुजन विकास आघाडीचे गटनेते शकील पटेल यांनी बंद लिफाफ्यामध्ये सदस्यांची नावे दिली.
या पक्षीय बलाबलानुसार स्थायी समितीमध्ये भाजपचे ११, काँग्रेस-शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे ४ व मुस्लिम बहुजन विकास आघाडीच्या एका सदस्यांची निवड करण्यात आली. परिवहन समितीमध्ये भाजपचे ८ काँग्रेस-शिवसेना (उबाठा) महाविकास आघाडीचे ३ व मुस्लिम बहुजन विकास आघाडीच्या १ सदस्यांचा समावेश झाला आहे. त्याचप्रमाणे अनुक्रमे स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती, विधी विशेष समिती, शिक्षण विशेष समिती, गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समिती, क्रीडा विशेष समिती, महिला व बालकल्याण विशेष समिती, जलप्रदाय विशेष समिती, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती व अग्निशमन व विद्युत विशेष समितीमध्ये पक्षीय बलाबल नुसार निवड करण्यात आली. गटनेत्यांनी बंद लिफाफ्यात दिलेल्या सदस्यांच्या नावाचे वाचन निगम सचिव व उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी सभागृहात केले. त्यानंतर महापौर निता ठाकरे यांनी या सदस्यांची निवड संबंधित समितीत्यांमध्ये सदस्य म्हणून झाल्याची घोषणा केली.
स्थायी समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे :
1.शिवानी सुधांशु दाणी – भाजप
2. स्वीटी किशोर भिसीकर- भाजप
3. प्रमिला अजय गौर – भाजप
4. विशाखा प्रकाश मोहोड – भाजप
5. निरंजना महेश पाटील – भाजप
6. ममता ठाकूर – भाजप
7. साधना बरडे – भाजप
8.अभिरुची अनिल राजगिरे – भाजप
9. शितल विजय रारोकर – भाजप
10. सानवी रविंद्र तरुडकर (शेंडे) – भाजप
11. मानसी निखिल सिमले – भाजप
12. मेरिस्टेला देवा उसरे – काँग्रेस
13. अभिजीत प्रभूकांत झा – काँग्रेस
14. वसीम खान रहीम – काँग्रेस
15.अभिषेक शंभरकर – काँग्रेस
16. असलम खान मुल्ला – मुस्लिम लिग
परिवहन समितीमध्ये निवड झालेल्या सदस्यांची नावे :
1. मंगला शशांक खेकरे – भाजप
2. सुधीर उर्फ बंडू हरीदास राऊत – भाजप
3. विजय होले – भाजप
4. अर्चना पडोळे – भाजप
5. प्रमिला प्रीतम मथरानी – भाजप
6. मंगला संजय मस्के – भाजप
7. रुपाली परशु ठाकूर – भाजप
8. पूजा अमित पाठक – भाजप
9. शैलेश पांडे – काँग्रेस
10.किशोर कुमेरिया – शिवसेना (उबाठा)
11. दिनेश वसंतलाल यादव – काँग्रेस
12. अब्दुल. करीम अब्दुल करीम पटेल (शकील पटेल) – एमआयएम
१. स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती
अश्विनी जयंत जिचकार
प्रदिप वसंतराव पोहाणे
दुर्गेश्वरी कैलास कोसेकर
महेंद्र रमेश धनविजय
चंद्रकांत मनोहरराव खंगार
विद्या राजेश कन्हेरे
सुनिता दिपकराव तभाने
कुमुदिनी प्रफुल्ल गुडधे
मो. मुजतबा मो.मुस्तफा अंसारी
2. वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती
मनिषा चक्रधर अतकरे
श्रीकांत गजाननराव आगलावे
विक्रम जगदिश ग्वालबंसी
पुजा जितेंद्र भुगावंकर
योगेश मारोतराव मडावी
रजनी सचिन वानखेडे
प्रमोद जोगेंद्रसिंग ठाकुर
भावना संतोष लोणारे
सोफिया आसिफ शेख (मांडवा)
३. विधी विशेष समिती
निधी नितिन तेलगोटे
अॅड. संजयकुमार कृष्णराव बालपांडे
धनश्री आशिष देशपांडे
शारदा सुरेश बारई
कल्पक सदाशिव भनारकर
निलेश मनोहर गायधने
अॅड. शैलेन्द्र श्रीराम डोरले
अॅड. स्नेहल बंडू उर्फ ज्ञानेश्वर ठाकरे
पवन बाळुजी कोये
४. शिक्षण विशेष समिती
संतोष देवी दीपक लढ्ढा
भारती विकास बुंदे
विनय विवेक दाणी
वैशाली विलास उदापुरकर (टोळ)
राम एकनाथ कुंभलकर
अंकीत सुखनंदन चौधरी
कांचन सतिश चव्हाण
सय्यद मुस्कान सय्यद इरफान
वर्षा बंडू डोंगरे
५. गलिच्छ वस्ती निर्मुलन व घर बांधणी विशेष समिती
रूतीका योगेश मसराम
दीप रमेशराव गवई
नागेश महादेव मानकर
योगिता धनराज तेलंग
हेमंत शांताराम बरडे
रितेश बापूराव पांडे
विवेक रमेश निकोसे
सुजाता विठ्ठलराव कोंबाडे
पवन बाळुजी कोये
६. क्रीडा विशेष समिती
दर्शनी स्वानंद धवड
संजय अरूणराव चावरे
ज्योती अरविंद देवघरे
ईश्वर रामकृष्णा ढेंगळे
कल्पना विक्रम शर्मा
प्रविण हेमराज गीन्हे
शुभम शेषराव मोटघरे
गौतम हरिभाऊ अंबादे
मो. मुजतबा मो.मुस्तफा अंसारी
७. महिला व बाल कल्याण विशेष समिती
सारिका सुनिल नांदुरकर
तारा (लक्ष्मी)ओमप्रकाश यादव
चेतना गुलशन टेकाम (निमजे)
महेश्वरी देवेंद्र बिसेन
रेखा गिरधारी निमजे
लक्ष्मी चंद्रभुषण हत्तीठेले
शिला दिनेश तराळे
कल्पना राजेंद्र द्रोणकर
तसनीम परवीन नियामत खान ताजी