spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

६ व ७ मार्च रोजी‘नागपूर ग्रंथोत्सव-२०२५’  

नागपूर :- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नागपूर व वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ६ व शनिवार ७ मार्च २०२६ रोजी वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था येथे ‘नागपूर ग्रंथोत्सव-२०२५’आयोजित करण्यात आला आहे.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, नागपूर-अमरावती विभागाचे माहिती संचालक डॉ. गणेश मुळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

ग्रंथोत्सवामध्ये पहिल्या दिवशी शुक्रवार ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते १० वाजता ग्रंथपुजन व ग्रंथदिंडी ही सेवा सदन शिक्षण संस्था प्रांगण झांशी राणी चौक पासून व्हेरायटी चौक, झिरो माईल, संविधान चौक ते वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था पर्यंत निघणार आहे. सकाळी ११ ते १ वाजेपर्यंत उदघाटन कार्यक्रम, नंतर दुपारी ३ ते ५.३० वाजता दिपलक्ष्मी भट या ‘लोकमाता अहिल्याबाई होळकर’ एकपात्री नाटय प्रयोग सादर करणार आहेत.

दुसऱ्या दिवशी शनिवार ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १ वाजता ‘ए आय’ काळातील वाचन संस्कृतीचे वर्तमान या विषयावर परिसंवाद होणार आहे. साहित्यिक, प्रसेन्नजित गायकवाड, डॉ. अरुंधती वैद्य, शफी पठाण आणि विजय सावंत हे परिसंवादात विचार मांडतील. दुपारी २ ते ४ वाजता प्रा. डॉ. देवा बोरकर (गोंदिया) हे ‘मी आंबेडकर बोलतोय’ एकपात्री नाटय प्रयोग सादर करतील. नंतर समारोपाचा कार्यक्रम होणार असल्याचे प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी मिनाक्षी कांबळे यांनी कळविले आहे.

Popular Articles