spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुळजाभवानी वस्ती संताजी परिसरात हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात

नागपूर :- तुळजाभवानी वस्ती संताजी परिसरामध्ये भव्य हिंदू संमेलन रविवारी पार पडले. आदल्या दिवशी शनिवारी सामूहिक रामरक्षा स्तोत्र मारुती स्तोत्र याचे पठण शंभर स्त्री, पुरुष व छोटे मुलं मिळून केले व दुसऱ्या दिवशी सकाळी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील संगीत खुर्ची, लिंबू चमचा, रांगोळी स्पर्धा व पुरुषांकरिता वलया रिंग स्पर्धा घेण्यात आल्या व संध्याकाळी पाच ते नऊ गो पूजन, ध्वजपूजन, भारत माता पूजन, आठवण विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. त्यात कथक नृत्य योगा नृत्य मिले सुर मेरा तुम्हारा यावर नृत्य व मी जिजाऊ बोलते. हा एक पात्र प्रयोग सौ. राखी जामकर यांनी सादर केला व नंतर श्री संजय सराफ यांचे उद्बोधन झाले व त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाचे शेवट झाली. या कार्यक्रमाला स्त्री, पुरुष व मुले पकडून पाचशे लोकांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.