कन्हान २२ : – टेकाडी परिसरातील कनय्या बाॅडी वर्कस समोरुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी १२ चाकी ट्रक चोरुन नेल्याने पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे .
शुक्रवार (दि.११) जुलै ला सकाळी ६:३० वाज ता दरम्यान क्रिष्णा काशीनाथ गौंड (२४) रा. खदान यांनी आपला ट्रक क्रमांक एम एच ४० एन ७५८० दुरुस्ती करण्यासाठी कनय्या बाॅडी वर्कस समोर उभा केला होता. क्रिष्णा ने मंगळवार (दि.१५) जुलै रात्री १ वाजता येऊन पाहणी केली असता ट्रक उभा होता. बुधवार (दि.१६) ला सकाळी ८ वाजता क्रिष्णाने कनय्या बाॅडी वर्कस कडे जाऊन पाहणी केली असता त्यांना ट्रक दिसुन आला नाही. क्रिष्णा ने आजु बाजुचा परिसरात विचारफुस आणि शोध घेतला असता ट्रक मिळुन आला नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कनय्या बाॅडी वर्कस समोर उभा असलेला ट्रक किंमत ३५०००० रुपये चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी क्रिष्णा गौंड यांचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .




