संजय कारवटकर यवतमाळ २२ : राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूल येथे दिनांक 21 व 22 जुलै पर्यंत नागपूर येथील सी. व्ही. रमण मोबाईल विज्ञान प्रदर्शनीच्या फिरत्या वाहनाची भेट झाली असून या माध्यमातून परिसर स्वच्छता यावर आधारित 24 विज्ञान प्रयोग व माहिती शाळेतील 1680 विदयार्थ्यांना देण्यात येणार आहे. या विज्ञान प्रदर्शनीला शाळेतील सर्व विज्ञान विषय शिक्षक सहकार्य करीत आहे. तसेच या फिरत्या विज्ञान प्रदर्शनीमुळे शाळेतील विद्यार्थ्यां मध्ये उत्साह दिसून येत आहे.या विज्ञान प्रदर्शनास शाळेचे मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी सहकार्य करीत आहे



