spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराजस्व समाधान शिबीराला नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

– शिबीरात ८०५ नागरीकांना मिळाला लाभ

सचिन चौरसिया,प्रतिनिधी रामटेक :- तालुक्यातील नगरधन येथे मोहित सभागृह स्थानिक तहसिल कार्यालयाद्वारे महाराजस्व अभियान टप्पा-१ अंतर्गत शनिवार( दि.०७) सकाळी ११ ते ०५ वाजेपर्यंत समाधान शिबिराचे आयोजन करून विविध शासकीय कार्यालयामार्फत लोकांना दाखल्यांचे वाटप करण्यात आले. एकूण ८०५ लाभार्थ्यांना विविध विभागांकडून लाभ देण्यात आला. सदर शिबीर रमेश कोळपे, तहसिलदार, रामटेक यांचे मार्गदर्शनार्थ यशस्वीरीत्या पार पडले. शिबीरात नोडल अधिकारी अखिल भारत मेश्राम, नागपूर, भुमिअभीलेख सहा. संचालक लालसिंग मीसाळ, भुमिअभीलेख जिल्हा अधिक्षक अभय जोशी, माजी जि. प. सदस्य सतीश डोंगरे, माजी जि. प. सदस्य शनरेश धोपटे, माजी उप सभापती उदयसिंह यादव, सरपंच नगरधन माया अरुन दमाहे, सरपंच आजनी मनोज लिल्हारे, उपसरपंच नगरधन श्राम धोपटे, माजी उपसरपंच नगरधन चंद्रकांत नंदनवार, तसेच नगरधन मंडळातील ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते. शिबिरामध्ये नगरधन मंडळातील ग्रामपंचायत नगरधन, आजनी, लोहडोंगरी, काचुरवाही, बोरी, किरणापूर, नवरगांव, व चिचाळा अंतर्गत गावातील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. शिबीरामध्ये नगरधन मंडळा अंतर्गत महसुल विभागाअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप, ७/१२ वाटप, फेरफार नोंदणी, उत्पन्न दाखले, निवडणूक विभाग १३ व इ. १७६, आपले सेवा सरकार केंद्र मार्फत ५५ दाखले, आधार नोंदणी १७, सं.गा.यो. ३१, पुरवठा विभाग १९, लार्भार्थ्यांना लाभ देण्यात आला. उपअधिक्षक, भुमि अभिलेख विभागामार्फत २, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ३१, आगार व्यवस्थापक यांचे तर्फे ७४ महिलांना प्रवासात ५० टक्के सुट सवलत दाखले, आरोग्य विभाखमार्फत आरोग्य तपासणी १९० लाभ, पंचायत समिती मार्फत ३१, तसेच महिला बाल विकास विभागामार्फत बेबी केयर किट वाटप ०२, कृषी विभाग विविध योजनेचे ११७, पशुसंवर्धन ५१, पेंच पाटबंधारे व लघु पाटबंधारे विभागामार्फत ०९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले. सदर शिबीरात पुनम कदम अप्पर तहसिलदार, जयसिंग जाधव गटविकास अधिकारी, प्रसन्ना भुजाडे, उपअधिक्षक भुमि अभिलेख, भोजराज बडवाईक नायब तहसिलदार, अमित निंबाळकर, नायब तहसिलदार, संदेश हलमारे निरीक्षण अधिकारी, सुनिल कोरटे, तालुका कृषी अधिकारी, प्रेरणा भगत मंडळ अधिकारी नगरधन, जयश्री तिजारे मंडळ अधिकारी, नगरधन मंडळातील सर्व ग्राम महसुल अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. काकडे व वैद्यकीय चमु, बस आगर व्यवस्थापक सेतु, आधार, महिला बचत गट महसुल विभागातील अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी व ईतर विभागातील अधिकारी व कर्मचारी या शिबिराकरिता उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.