spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आज कोदामेंढी व खात या दोन जि प सर्कल मध्ये पालकमंत्री तथा महसूल मंत्री यांच्या दीपावली मिलन कार्यक्रम अंतर्गत गाव भेट दौरा 

किशोर साहू, मौदा :- कोदामेंढी-अरोली जि प क्षेत्रातील बेरडेपार, भांडेवाडी, अडेगाव, धानोली, तोंडली व खात – रेवराल जि प क्षेत्रातील धर्मापुरी, खात, घोटमुंढरी, मांगली ( तेली) या गावांमध्ये आज शनिवार (ता.२१ नोव्हेंबर) ला दुपारी ११:३० वाजता पासून ते रात्री ८:३० वाजेपर्यंत पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दीपावली मिलन कार्यक्रमांतर्गत गाव भेट दौरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्य ते त्या संबंधित गावातील नागरिकांची संवाद साधणार आहे. तरी या गाव भेट दौरा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आव्हान भाजपा तालुका मौदा मंडळ अध्यक्ष भगवान बावनकुळे तथा माजी भाजपा मौदा तालुका मंडळ अध्यक्ष मुकेश अग्रवाल, खात-रेवराल जि प सर्कलच्या माजी जि प सदस्य राधा मुकेश अग्रवाल सह तालुक्यातील भाजपा व भाजयूमो पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Popular Articles