spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई :- मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या बैठकीस परिवहन विभागाचे अधिकारी यांनाही बोलवण्यात येईल असे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य सुनील शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य प्रवीण दरेकर, सचिन अहिर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणल्या, मुंबईची लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेता शहरात किमान १० हजार बसची आवश्यकता आहे. यासाठी बेस्टने विविध कंत्राटदारांना ६,५५५ बस पुरवठ्यासाठी वर्क ऑर्डर दिल्या होत्या. मात्र कंत्राटदारांकडून बस वेळेत उपलब्ध होऊ न शकल्याने अपेक्षित प्रमाणात बससेवा वाढवता आली नाही. मार्च २०२३ पर्यंत १,३०० बस उपलब्ध होणे अपेक्षित होते, मात्र सध्या केवळ ६८५ बस उपलब्ध झाल्या आहेत.

स्क्रॅपिंग पॉलिसीनुसार १५ वर्षांनंतर बस स्क्रॅप केल्या जात असल्याने बेस्टच्या मालकीच्या बसची संख्या कमी झाली आहे. पूर्वी बेस्टकडे १,८८२ मालकीच्या बस होत्या, मात्र सध्या ही संख्या २४९ इतकी राहिली आहे. उर्वरित बस भाडेतत्त्वावर घेतल्या असून सध्या २,५५८ भाडेतत्त्वावरील बस उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Popular Articles