महात्मा फुले शिक्षण संस्थेत जागतिक महिला दिवस व क्रांतिज्योती सावित्रीआई फुले पुण्यतिथी संपन्न

0
39

नागपूर :- महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग येथे मंगळवारी 10 मार्च ला महिला विकास समिती द्वारा जागतिक महिला दिवस व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले स्मृतीदिन संपन्न झाला. सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीआई फुले यांच्या पुतळ्यास संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार व प्रमुख पाहुणे व वक्ता डॉ मेघना वासनकर (बगडे), उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक, नागपूर महानगर पालिका यांच्या शुभहस्ते माल्यार्पन करून मानवंदना देण्यात आली व मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात झाली. याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती लाभलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका मंगला संजय मस्के, मानसी नितिन सिमले, ज्योती अरविंद देवघरे तसेच सामाजिक कार्यकर्त्या रंजना गंगाधर कडूकर, उद्योजिका शितल पंकज नेरकर,महिला संघटक  सुरेखा विजय गाणार, मेहंदी रांगोळी आर्टिस्ट सरीता हेमंत पारधी यांना शाल, मोमेन्टो, श्रीफळ व रोपटे देऊन मान्यवरांचे हस्ते सन्माननीत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.मेघना वासनकर (बगडे) यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला सक्षमीकरण व राजकीय व सामाजिक घडामोडी वर संकल्पना स्पष्ट केल्या तर उपस्थित सत्कारमूर्ती यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. तसेच अध्यक्ष भाषणात प्रा.अरुण पवार यांनी महिलांना शुभेच्छा देऊन प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले. यानंतर जागतिक महिला दिना निमित्याने समिती द्वारा महिलांनी सावित्रीआई फुले व महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन समिती संयोजिका शोभा लेकुरवाळे यांनी केले तर सामिती सदस्या उज्वला पाटील यांनी प्रास्ताविक व मान्यवरांचे आभार मानले. प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले संस्थेचे उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रविन्द्र अंबाडकर, कोषाध्यक्ष मुकेश घोळसे, तसेच संचालक राजेंद्र पाटील, मोहित श्रीखंडे, डॉ. अभिजीत पोतले, प्रा. पंकज कुरळकर, देवेंन्द्र काटे, नंदू कण्हेर तसेच भगिणीं समिती सदस्या सुलेखा पवार, नंदा सोनुले, ज्योती बनकर, हेमलता घोळसे, अर्चना घोंगडी, शितल श्रीखंडे, मंगला ठाकरे, सिंधू कांडलकर,ज्योती ठाकरे, कविता खसाळे, सिमा गाडगे, रचना कन्हेर, संगिता बानाईत, नलिनी उमप, कुंदा राऊत, सरीता पोतले, विविध क्षेत्रातील महिला भगिणीं समाज बांधव कार्यकर्ते कर्मचारी वृंद विद्यार्थी गण उपस्थित होते.