जिल्ह्यातील ५८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे

0
38

गोंदिया :- समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील अनेक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ५८ शाळा आणि ८ बीआरसीमध्ये विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे दिले जात आहेत.संगणक प्रयोगशाळेसाठी प्रत्येक शाळेवर संगणक निर्देशकसुद्धा रुजू करण्यात आले आहेत. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावे पण लागेल हे उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद राज्य प्रकल्प संचालक मां.संजय यादव भा. प्र. से. समग्र शिक्षा मुंबई/महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांनी आय.सी. टी. (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी) हा उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.शिक्षणाधिकारी प्राथमिक विशाल डोंगरे , शिक्षणाधिकारी माध्यमिक सुधीर महामुनी,उप शिक्षणाधिकारी प्राथमिक महेंद्र मोटघरे, जिल्हा प्रकल्प समन्वयक (आय.सी. टी. ) सुभाष चौरागडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे.

समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मिळालेल्या संगणक प्रयोगशाळेच्या माध्यमातून संगणक निर्देशक व इंग्लिस लर्निंग सॉफ्टवेअरच्या मदतीने अध्यापन सुरु आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेतच संगणकाचे धडे मिळत आहेत. शासनाचा हा उपक्रम ग्रामीण विद्यार्थ्यांना अत्यंत महत्वाचा ठरला आहे. यामुळे संगणक शिक्षणाला चालना मिळत आहे .

– महेश कनपटे संगणक निर्देशक,जि.प.उत्तर बुनियादी उच्च .प्रा.शाळा तिरोडा