spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराजस्व समाधान शिबीर अभियानाच्या पहिल्या टप्प्यात तीन मंडळ ठरले उत्कृष्ट ; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मंडळ अधिकाऱ्यांचा सत्कार

यवतमाळ :- “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियानाअंतर्गत जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ७ मार्चच्या पहिल्या टप्प्यातील शिबिरांचे गुणांकन पूर्ण झाले असून त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लोणबेहळ, शिरजगाव, गणेशपूर या तीन मंडळांची निवड करण्यात आली आहे. उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या मंडळांच्या मंडळ अधिकाऱ्यांचा जिल्हाधिकारी विकास मिना यांनी प्रमाणपत्र देवून सत्कार शुक्रवारी केला.

प्राप्त गुणांनुसार आर्णी तालुक्यातील लोणबेहळ मंडळाने ५९ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. नेर तालुक्यातील शिरजगाव मंडळाने ५४ गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला असून वणी तालुक्यातील गणेशपूर मंडळाने ५३.५ गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे.

महाराजस्व समाधान शिबिरात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मंडळ अधिकारी तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अभिनंदन केले तसेच पुढील कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, इतर मंडळांनी पुढील टप्प्यांमध्ये अधिक चांगली कामगिरी करावी, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Popular Articles