spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर आमडी येथे संपन्न

– आमडी शिबीरात परिसरातील १२६३ नागरिकांनी प्रत्यक्ष सहभाग, १२४८ नागरिकांना योजनेचा लाभ. 

कन्हान :- पारशिवनी तहसिल अंतर्गत आमड़ी येथे दूस-या टप्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीरात विविध शासकिय येजनेचा लाभ नागरिकांना देऊन शिबीर शांततेत संपन्न झाले.

शनिवार (दि.१४) मार्च ला आमडी येथे सुरेश वाघचौर तहसिलदार पारशिवनी यांच्या प्रमुख उपस्थितीत राजेश गोमकाले तालुकाध्यक्ष समन्वय समिती तालुका, राजु भोस्कर अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना, सुभाष तड़स उपसभापती कृषी उत्पन्न बजार समिती, सुभाष जाधव गटविकास अधिकारी , डॉ वैशाली हिंगे प्रा आरोग्य केन्द साटक, राकेश वशु तालुका कृषी अधिकारी, साटक पशुवैद्यकिय अधिकारी आमड़ी व साटक तसेच संबंधित गावांचे सरपंच,उप सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, मिश्रा, कुंभरे, सोनाली टेगुरे, नायब तहसिलदार, जि प शाळेचे शिक्षक, शिक्षिका सह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या शिबीरात १२४८ नागरिकांनी विविध शासकीय योजने चा लाभ प्रदान करण्यात आला. नागरिकांना सातबारा , फॉर्म ४-ए, फेरफार संशोधन, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, संजय गांधी योजना, राशन कार्ड, सनद वितरण, आरोग्य तपासणी, आधार कार्ड, प्रधानमंत्री किसान सम्मान निधि स्वीकृति तथा लक्ष्मी मुक्ति अश्या विविध योजना संबंधित सेवा प्रदान करण्यात आल्या. शिबीरात तहसिल कार्यालय अंतर्गत विभागाचे स्टाल लावण्यात आले होते. नायब तहसिलदार सहित मंडल अधिकारी, महसुल विभाग चे पट वारी, कर्मचारी, आमडी ग्राम पंचायत अधिकारी, कर्म. चारी, आंगनवाड़ी सेविका, आशा वर्कर आदी उपस्थित होते. शिबीरात १२६३ नागरिकांनी प्रत्यक्ष भाग घेतला . यात १५ शेतक-यांचे तुकडेबंदी प्रस्ताव नोंद करून अधिका-यांनी आवश्यक कारवाईचे आश्वासन दिले.

Popular Articles