spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपात स्वीकृत सदस्यांसाठी संधी देण्यात यावी

– राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीचे निवेदन ! – मनीषा पापडकर

नागपूर :- एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले की, नागपूर महानगर पालिकेतील स्वीकृत सदस्यांसाठी महिलेला संधी देण्याची मागणी जिल्हा प्रमुख मनीषा पापडकर यांनी भूमिका मांडली. नागपुर मनपामध्ये आपला एकच पुरुष नगरसेवक निवडून आलेला आहेत. आणि सध्या भाजप तर्फे नागपूर महानगरपालिकेमध्ये महिलांना संधी देण्यात आली आहे आपणही सुद्धा नागपूर महानगर पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक ५०% आधारावर शहरातील महिला आघाडीच्या मनीषा पापडकर जिल्हाप्रमुख यांना संधी दयावी. नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासह विविध विशेष समितीच्या अध्यक्षपदी महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे, नागपूर मनपात महिला राज प्रस्थापित करण्याच्या दृष्टीकोनातुन भाजप पक्षाने स्थायी समिती परिवहन समिती आणि अन्य दहा विविध समितीच्या अध्यक्षपदी महिलांची नियुक्त केले आहे, त्याचप्रमाणे आपल्या शिवसेनेतर्फे सुद्धा महिलांना संधी देऊन महानगरपालिकेमध्ये नागरिकाचे प्रश्न सोडवण्याची महिलांना सुद्धा अधिकार द्यावे, आपला पक्ष बळकट होऊन जनतेमध्ये शिवसेना पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी आपण महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची विनंती केली, शिवसेना ही तळागाळातील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न करित असते. आपल्या लाडक्या बहिणीला सुवर्णसंधी देऊन मान सन्मान करावा. आपण दाखविलेला विश्वास सार्थ ठरवून दिलेल्या संधीचे नक्कीच सोने करेल असा आशावाद व्यक्त केला. यावर शिंदेंनी महिलांना संधी देण्याचे आश्वासन दिले. तसेच शिवसेना सचिव, आमदार डॉ.मनीषाताई कांयदे यांच्या सोबत बसून यावर निर्णय घेण्यात येईल. असे नागपूरच्या जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.