spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इतवारी भागातील नववर्ष स्वागत समिती तर्फे महिलांची अभिनंदन स्कूटर रॅली आज

नागपूर :- नववर्षाच्या स्वागतानिमित्त भारतीय नववर्ष स्वागत समिती, इतवारीभागाच्या वतीने बुधवारी १८ मार्च ला दुपारी ४.०० वाजता. महिलांच्या अभिनंदन स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आग्याराम मंदिर येथून रॅली प्रारंभ होऊन पोद्दारेश्वर राम मंदिर येथे समारोप होईल. यामध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी घोषवाक्य स्पर्धा, स्कूटर सजावट स्पर्धा तसेच उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रत्येक स्पर्धेतील तीन विजेत्यांना बक्षिस देण्यात येईल. उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेत विजेते ठरणाऱ्या महिलेला राजलक्ष्मी साडी तर्फे पैठणी प्रदान करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी प्रत्येक महिलेला रोकडे ज्वेलर्स तर्फे एकदाणी भेट दिली जाणार. पोद्दारेश्वर राम मंदिर येथे अल्पोपाहारा नंतर कुपन दाखवून भेटवस्तू स्वीकारता येईल. स्कूटर रॅलीत जास्तीत जास्त मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील श्रद्धा पाठक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Popular Articles