spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जवाहर विद्यार्थी गृहातर्फे २९० समाजबांधवांचा भव्य सत्कार

– गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, सुवर्णमहोत्सवी दाम्पत्य व विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव

नागपूर :- जवाहर विद्यार्थी गृह, नागपूरच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी, पीएच.डी. धारक युवक-युवती, ७५ वर्षे पूर्ण करणारे ज्येष्ठ नागरिक, सुखी सहजीवनाची ५० वर्षे पूर्ण करणारे दाम्पत्य तसेच समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींचा भव्य सत्कार समारंभ जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात तब्बल २९० समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास निवृत्त न्यायाधीश मुरलीधर गिरडकर, किशोर वरंभे, उपाध्यक्ष, श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा, धर्मराज रेवतकर, ॲड. नरेंद्र ढगे, अध्यक्ष, तेली समाज सभा, ॲड. जगदीश गायधने, माजी कोषाध्यक्ष, जवाहर विद्यार्थी गृह, डॉ. संजय दुधे, माजी प्र-कुलगुरू, डॉ. संजय ढोबळे, विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र, श्याम वैद्य, तसेच माजी विश्वस्त डॉ. सौ. विजया बालपांडे, अरुण वैद्य आणि माजी कोषाध्यक्ष अजबराव काळबांडे, श्री बारई, निवृत्त उपसंचालक टाउन प्लानिंग यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २९० समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि ५० वर्षांचे वैवाहिक जीवन पूर्ण करणाऱ्या दाम्पत्यांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी समाजातील गुणवंतांचा सन्मान करण्याची ही परंपरा कौतुकास्पद असल्याचे सांगत, अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळते आणि समाजातील विविध क्षेत्रांतील कर्तृत्वाला व्यासपीठ मिळते, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र कुमार दिवटे, मुख्य कार्यवाह हर्षवर्धन बेले आणि कोषाध्यक्ष बालानंद टपरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यकारिणी सदस्य प्रवीण आंबागडे,  प्रज्ञा बडवाईक, प्रकाश तिळगुळे, प्रफुल्ल रेवतकर, विजय मोटघरे, देवेंद्र वाडीभस्मे, हरीश जयपूरकर, लोकनाथ भुरे आणि रवी उराडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. रमेश पिसे व हरीश दांडेकर यांनी केले. जवाहर विद्यार्थी गृहाच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभामुळे गुणवंतांचा गौरव, ज्येष्ठांचा सन्मान आणि समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्याचा सकारात्मक संदेश समाजात पोहोचला.

Popular Articles