किशोर साहू, मौदा :- 17 मार्चपासून मौदा तालुक्यात ढगाळ वातावरण होते. मात्र शुक्रवार (ता. 20 मार्च)ला पहाटेपासून तर सायंकाळपर्यंत तालुक्यात वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या वेळेत हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र चाचेर येथे सायंकाळी पाचच्या दरम्यान जोरदार पावसाच्या सरीसह गारपिटही झाल्याने


शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे नुकसान झाल्याचे चाचेर येथील सामाजिक कार्यकर्ते हर्षद बरबटे व शंकर बावनकुळे यांनी फोटो व व्हिडिओ पाठवून भ्रमणध्वनी वरून सांगितले. तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा किसान आघाडी नागपूर जिल्हा रामटेक (ग्रामीण) मंत्री विनोद कोपरकर यांनी केली आहे.



