किशोर साहू, मौदा :- दरवर्षीप्रमाणे यंदाही चाचेर येथील बाजार चौकात गुरुवार (ता. 19 मार्च)ला गुढीचे पूजन करून गुढीपाडवा (मराठी नूतन वर्ष) उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितितांनी एकमेकांना मराठी नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी जि प सदस्य कैलास बरबटे, प्रकाश काळे, भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष नागपूर जिल्हा रामटेक (ग्रामीण) संजू वाघमारे, मंत्री किरण बरबटे,किशोर बरबटे ,गोपीचंद राऊत ,बल्लू टेंभरे, राजू झाडे, दिलीप गडे, दिलीप घाटे नारायण पोटभरे, शंकर झलके, लोकेश राऊत, अमित खंडाईत, सुनील महादुले सह ग्रामस्थ उपस्थित होते.



