जि. प. उच्च प्राथमिक आदर्श शाळा घोटमुंढरी च्या विद्यार्थ्यांची नवोदय, सैनिकी, एन एम एम एस परीक्षेत सुयश, सर्वत्र कौतुकांच्या वर्षाव

0
80

किशोर साहू, मौदा :- पंचायत समिती मौदा अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्रा. आदर्श शाळा घोटमुंढरी या शाळेची 2025- 2026 या शैक्षणिक सत्राची उत्कृष्ट कामगिरी बद्दल जिकडे तिकडे कौतुक होत आहे.

मागील वर्षी नवोदय ला मोनाक्षी श्रावणकर हिची निवड झाली तर यावर्षी सुद्धा मुस्कान अनुप घरडे या विद्यार्थिनी नवोदय विद्यालय प्रवेश साठी पात्र ठरली.

सैनिकी स्कूल परीक्षेत याच शाळेतील मुस्कान घरडे ,परिधि ईश्वरकर, सम्यक गजभिये,सुनील सोमनाथे ,नक्ष मेश्राम हे पाच विद्यार्थी पात्र ठरले.8 वा वर्ग एन एम एम एस (NMMS )परीक्षेत इशिका श्रावणकर, आयुती घरडे, गौरी क्षीरसागर हे तीन विद्यार्थी पास झाले.वर्ग दुसरी ते सातवी पर्यंत ज्युनियर IAS या परिक्षेत सुद्धा बसलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्राविण्य गुण प्राप्त केले .

तसेच दरवर्षी वर्ग 8 वा मध्ये प्रथम येणाऱ्या एका विद्यार्थ्यांला अर्जुन घरडे पुरस्कार पाच हजार रुपये दरवर्षी देण्यात येते. हा पुरस्कार प्रथम क्रमांक घेऊन गायत्री आंबेकर मु.आष्टी वर्ग 8 वा या विद्यार्थिनीने प्राप्त केला.

या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत,सत्कार शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आले व पुढील वाटचालीच्या शुभेच्या देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला चंदा गेडाम सरपंच ,गोरक्षनाथ मडावी तंटामुक्ती अध्यक्ष,उदय पांडे शाळा व्य. अध्यक्ष,मंगेश अंबिलढुके शाळा व्य. उपाध्यक्ष, विकास धारगावे मुख्याध्यापक, अर्जून घरडे , डॉ.मिलिंद रंगारी,शंकर पटले सदस्य,प्रवीण राऊत,अमोल उईके ,प्रशांत वाढवे,प्रतीक पटले,चेतन पटले,नीता घरडे, मौसमी घरडे,अपर्णा घरडे,सुरेखा श्रावणकर, आरती श्रावणकर,शीतल बागडे, प्रियंका श्रावणकर,मोनाली पटले,सोनू कुलसाम,सुलोचना ढोरे, शिक्षकवृंद खुरसुंगे, थुलकर ,आम्रपाली घरडे, कीर्ती पटले,मनोज वंजारी ,सुखदेवे , मेळे ,बॅनर्जी या सर्वांच्या उपस्थितीत हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आनंददायी पद्धतीने शैक्षणिक मार्गदर्शन करून संपन्न झाले.

तसेच गोरक्षनाथ मडावी तंटामुक्ती अध्यक्ष यांनी आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना नवोदय च्या पुढील सत्रासाठी नवोदय परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या 10 पुस्तक त्यांच्याकडून भेट देण्याचे जाहीर केले.करिता सर्वांनी त्यांचे खूप खूप आभार मानले.