– श्रीरामरक्षेतून धर्मरक्षेची प्रेरणा मिळते- आचार्य तुषार भोसले यांचे प्रतिपादन
नागपूर :- भाजप आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर द्वारे श्रीराम नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून शनिवारी देवेंद्रजी फडणवीस यांचे जनसंपर्क कार्यालय ,प्रताप नगर येथे नागपुरातील आध्यात्मिक क्षेत्रातील सेवाव्रतींचा भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांचे हस्ते श्रीराम सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कीर्तन क्षेत्रात ह भ प प्रज्ञा कुलकर्णी, पौरोहित्य क्षेत्रात वेदमूर्ती नचिकेत काळे गुरुजी, आरोग्य क्षेत्रात ज्येष्ठ निसर्गोपचार तज्ञ- योगगुरू डॉ मुकुल गुरु, भक्तीक्षेत्रात ज्येष्ठ भजन कलावंत रघुनाथराव रागीट, संगीत क्षेत्रात वैष्णवी जगदाळे आदी रामभक्तांना मान्यवरांचा शाल श्रीफळ व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेस पुष्प वाहून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. उपस्थित मातृशक्तींनी श्रीराम रक्षा व श्री मारुती स्तोत्राचे सामूहिक पठण केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रीराम व भारत मातेची मंगल आरती करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नगरसेविका माया हाडे, वर्षा चौधरी, डॉ श्रीरंग वराडपांडे, सावदेकर, नितीन महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी श्रीराम हे हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असून श्रीराम रक्षा पठणातून धर्मरक्षेची प्रेरणा मिळते असे उद्गार आचार्य तुषार भोसले यांनी काढले व हिंदू जनजागृतीसाठी आव्हान केले. कार्यक्रमाचे संयोजन भाजप आध्यात्मिक आघाडी नागपूर महानगर चे अध्यक्ष डॉ श्रीरंग वराडपांडे यांचे असून सूत्रसंचालन श्रेया पाटील यांनी केले. सीमा सराफ यांनी पसायदान गाऊन कार्यक्रमाचा समारोप केला. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात रामभक्त उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सपना रोडी, अभिजित कठले, सुजाता कठोटे ,चंद्रशेखर दुबे, ज्योती हराड, दर्शना नखाते, राज गोरे, धनश्री बोरकर, प्रज्ञा जोशी, विजय येरणे, योगेश धाबले, कृष्ण डोमके,आदींनी परिश्रम घेतले.



