खापा नगरीत विराट हिंदू संम्मेलन उत्साहात संपन्न

0
67

– सकल हिंदू समाजाने एका छताखाली यावे – हिंदू संमेलनात धर्मप्रसार अटल पांडे यांचे आवाहन.

खापा, वार्ताहर :- हिंदू धर्म, परंपरा, संस्कृती आणि मूल्यांचे संरक्षण व संवर्धन या उद्देशाने हिंदू संमेलन समिती, खापा यांच्या वतीने भव्य “हिंदू संमेलन” बँक ऑफ बडोदा समोरील प्रांगणात शुक्रवार २० मार्च रोजी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मोठ्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाची प्रस्तावना हरीश लाड यांनी केली. त्यांनी या संमेलनाची पार्श्वभूमी मांडली. प्रमुख वक्ता म्हणून अटल पांडे (वर्धा) व श्रीकांत नानोटी (धापेवाडा) उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

त्यानंतर प्रमुख वक्ते अटल पांडे (मु. वर्धा) यांनी हिंदू एकता, संस्कार, परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यासाठी सकल हिंदू समाजाने एका छताखाली येणे ही काळाची गरज आहे, असे आवाहन धर्मप्रसार अटल पांडे यांनी केले. मुख्य वक्ता म्हणून त्यांनी उपरोक्त आवाहन केले. तत्पश्चात अटल पांडे यांनी आपल्या ओतप्रोत भाषणाने सादर करत उपस्थितांचे उद्बोधन केले.

प्रमुख वक्ता श्रीकांत नानोटी यांनी ‘सामाजिक समरसता आणि त्याची अनिवार्यता’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी आपल्याला समाज परिवर्तन करायचे आहे. त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. समानता आपल्याला केवळ ओठात नको कृतीत हवी आहे. समाजात सद्भावना असायला हवी. कुटुंबात आपल्या संस्कार, परंपरांची चर्चा करायला हवी. ह्या सगळ्या गोष्टी आचरणात आणल्या तर आपला समाज बलशाली होईल, असे ते म्हणाले.

प्रमुख वक्त्यांसह या प्रसंगी उद्धव चौधरी, ब्रह्मकुमारी विजया हलगे दिदी, माजी सैनिक मेजर दिलीप गभणे, पांडुरंग सुपारे गुरुजी, हरीश लाड यांनीही आपले विचार मांडले. त्यांच्या विचारांनी कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत पराते, योगेश गोखे, रामदास बुरडे, किशोर बुरडे, प्रशांत बुरडे, सोनल बुरडे, मोनल बुरडे, वल्लभ बुरडे, प्रज्वल नांदनवर, अमोल लाड, योगेश मदनकर, पियुष बुरडे, अर्जुन जांगडे, अमित राय, मुन्ना शर्मा, आनंद मेनकुदळे, चंदू लिखार, निखिल आष्टणकर, जयंत लांजेवार, सचिन आकरे, दर्शन मासुरकर, माधव बुरडे, किशोर आष्टणकर आदींना अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शहरातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आयोजक, कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच उपस्थित मान्यवर व नागरिकांचे आभार शिवप्रसाद पिंपळकर यांनी मानले. कार्यकमाच्या शेवटी सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन दीपक क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रसाद वितरण आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.