खापा, वार्ताहर :- खापा शहर येथे रमजान ईदच्या पर्वानिमित्त मुस्लीम बांधवातर्फे ‘ईद उल फित्र’ साजरी करण्यात आली. खापा मस्जिद कमेटीच्या वतीने प्रसिध्द दर्शनीय स्थळ सैय्यद हजरत बाबा लष्कर शाह शहीद दरगाह येथील इदगाह मध्ये (दि.२१) शनिवारी सकाळी नऊ वाजता नमाज अदा करण्यात आली.
हाफीज व कारी हारून रशीद यांनी पूर्ण रमजान महिना तरावीहची विषेश नमाज पठण केली. मौलाना मकसूद आलम यांनी शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांना रमजान ईदची नमाज पठण केले व मौलाना शोएब रजा यांनी समस्त देश वासियांसाठी दुआ केली. तसेच वाकोडी, बडेगाव येथे पण नमाज पठण करित ईद उत्साहात साजरी करण्यात आली.
नंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट /मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय मुस्लिम बांधवांनी एकत्र येत हिंदू बांधवांकडे जात ईद मुबारक स्वीकारली. शेवई आणि शिरखुर्माच्या मेजवानीसाठी आमंत्रित केले. मुस्लिम बांधव आणि निमंत्रित मित्रांसोबत दिवसभर मेजवानी सुरू होती.
खापा पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर भुजाडे पोलीस, स. पो. उ. नि. नारायण बोरकर, स. पो. उ. नि. जगदीश पालीवाल, स. पो. उ. नि. सचिन जंगम, परवेज शेख, राहूल रेवतकर, विशाल महालकर, श्याम सोलंकी, नितेश चीपडे, संजय दशमवार, मंगेश भालेराव यांच्यासह पोलीसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
यशस्वी आयोजनार्थ खापा मस्जिद कमेटीचे अध्यक्ष अफसर शेख, उपाध्यक्ष सईद कुरेशी, सचिव मकसूद शेख, सहसचिव आशिक पठान, कोषाध्यक्ष गुड्डू पठान, सदस्य छल्लू शेख, मोहसिन पठान, मस्तान कुरेशी, सलमान कुरेशी, अहेफाज कुरेशी, भुरू शेख, प्यारू शेख, साजिद शेख व शहरातील ज्येष्ठ नागरिक महेबुब शेख, गफ्फार शेख, हसन कुरेशी, युनुस कुरेशी, हमीद कुरेशी, यासिन पठाण, बब्बु शेख, मुस्ताक सुभेदार, रहेमत अली सैय्यद, नूर कुरेशी, ईसराईल शेख, शकुर शेख, कौसर खान, सादिक बाघाडे, तोसिफ शेख, अझरुद्दीन शेख व समस्त समाज बांधव यांनी सहकार्य केले.



