” तुझे मेरे गीत बुलाते है” स्वरानंद म्यूजिक अकादमी प्रस्तुत, सायंटिफिक सभागृहात 22 मार्चला

0
47

नागपूर :- स्वरानंद म्यूजिक अकादमी तर्फे बहारदार हिंदी गीतांचा आयोजित कार्यक्रम रविवार दि.२२ मार्च रोजी, सायंकाळी ६.३० ते ८ः३० या दरम्यान. हिंदी गीतांचा अप्रितम कार्यक्रम “रंग माझा वेगळा भाग- ४” हा कार्यक्रम सायंटिफिक सभागृह लक्ष्मीनगर येथे करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बहारदार हिंदी गीतांची सुरेल मैफिल सादर करण्याचा प्रयत्न स्वरानंद चे अध्यक्ष व नागपूरचे सुप्रसिद्ध गायक अविनाश घोंगे व स्वरानंदच्या सदस्या व आकाशवाणीची मान्यता प्राप्त गायिका राखी काटोलकर व अर्चना पडेगांवकर आणि वैदही हेजीब करणार आहे. निवेदक रेवती बडगे यांचे असून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. वादक कलाकार विलास पुजारी, प्रशांत खडसे, उल्लास चिटमुलवार, अनिकेत दहेकर, प्रमोद बावणे, नचिकेत देव, नितीन अहिरे यावेळी वादक कलाकारांची उपस्थिती राहतील. हा कार्यक्रम निःशुल्क असल्याने जास्तीत जास्त मोठ्या संख्येने व नागरिकांनी आनंद घ्यावा. असे आवाहन सचिव देवेंद्र काटोलकर यांनी माहिती दिली.