नागपूर :- दीक्षाभूमी दक्षता समितीच्या वतीने पत्रकार भवन येथे पत्रपरिषद घेण्यात आली. त्यावेळी किशोर गेडाम आणि माया उके यांनी सांगितले की, सम्राट अशोक जयंती निमित्ताने 125 फूट ध्वज हातात घेऊन पंचशील धम्म ध्वज यात्रेचे आयोजन मंगळवारी 24 मार्च रोजी करण्याचे आयोजिले आहे.चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2023 व्या जयंती प्रीतळ दीक्षाभूमी दक्षता समिती सम्राट अशोक सेना अखिल भारतीय समता सैनिक दलाच्या संयुक्त विद्यमाने धम्मदोष यात्रेचे आयोजन करण्यात आले असून धम्मदोष यात्रेचा मार्ग राठी कॉलनीतून मेट्रो स्टेशन ते दीक्षाभूमी असा राहणार आहे धम्मदोष यात्रेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई पंचशील ध्वज दाखवून शुभारंभ करणार आहेत. दीक्षाभूमी मध्ये पंचशील धम्म ध्वज यात्रेचा प्रवेश झाल्यानंतर दीक्षाभूमीवर सम्राट अशोक यांचा पूर्ण आकृती पुतळ्याला मार्ल्यापण करून त्रिशरण पंचशील घेण्यात येईल. सम्राट अशोक यांच्या जयंती प्रीत्यर्थ काढण्यात येणाऱ्या पंचशील ध्वज यात्रेला यशस्वी करण्यासाठी नागपूर शहर व नागपूर ग्रामीणच्या सगळ्या बौद्ध विहाराच्या कमिटी उपासक – उपासिका उपस्थित राहणार आहे. पंचशील ध्वज यात्रा काढून प्रियदर्शी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती यशस्वीरित्या साजरी करण्यासाठी दीक्षाभूमी दक्षता समितीचे अध्यक्षा माया उके, अभिषेक फुलकर, आशिष बनसोड, किशोर गेडाम, गंगा टेंभुर्णे, माला अंबुलकर, रत्नाकर खोब्रागडे, वैशाली डबरासे, राजेंद्र बोबडे, कविता लांडगे, किरण गौरखेडे, वर्षा वालदे, माधुरी बनसोड, पूर्णिमा शेंडे, शिवानी शेंडे, इत्यादी परिश्रम घेत आहे. अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये किशोर गेडाम आणि माया उके यांनी दिली.
Home Latest News सम्राट अशोक जयंती निमित्ताने मंगळवारी रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमीवर पंचशिल धम्म ध्वज...



