Home Latest News रवी शेंडे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची पत्रपरिषदेत मागणी –...

रवी शेंडे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यातील गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची पत्रपरिषदेत मागणी – दिनेश अंडरसहारे

0
40

नागपूर :- सम्राट अशोक धम्म सेनेच्या अंतर्गत दिनेश अंडरसहारे यांनी आनंदनगर येथील आंबेडकरी कार्यकर्ते रवीभाऊ शेंडे यांच्या घरावरील परिवाराच्या लोकांवरील प्राण घातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ पत्रपरिषद घेऊन या प्रकरणातील चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली. आंबेडकरी सामाजिक चळवळीचे नेते रवि शेंडेच्या परिवारातील सदस्यांवर ३ मार्च २०२६ होळी च्या पाडव्याच्या रोजी वस्तीतील कुख्यात गुंड भुरु उर्फ डॉन यांचे साथीदार अनिकेत गौर उर्फ बग्गा व गुंड प्रवृत्तीच्या आठ ते दहा जणांनी शस्त्रासह प्राण घातक हल्ला केला आणि वस्तीतील नागरिकांना शिव्यागाळ करून वस्ती निस्तनाबूत करण्याची धमकी देत हैदोष घातला होता. अशा गुन्हेगारावरील ॲट्रॉसिटी सह मोका लावा. अशी मागणी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंबेडकरी कार्यकर्ते व सामाजिक नेते रवी शेंडे यांना शासनाकडून संरक्षण देण्याची मागणी नामदेवराव निकोसे यांनी यावेळी केली. आणि दिनेश अंडरसहारे यांनी म्हटले की, जर शेन्डे परिवाराला न्याय मिळाला नाही तर आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करू ? त्यात अनहोणी झाली तर त्याला पोलीस विभाग जबाबदार राहतील. असे पत्रकारांना सांगितले गेले. पत्रपरिषदेला मंचावरील नामदेवरावजी निकोसे, दिनेश अंडरसहारे, प्रकाश बौद्ध, कमलेश मेश्राम, आणि राजू मांडवे यांची उपस्थिती होती.