Saturday, April 25, 2026
spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

अवैध रेती वाहतूक प्रकरणात २ गुन्हे; ४ वाहने जप्त, ५७.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त

सावनेर :-  सावनेर पोलीसांनी सतर्क पेट्रोलींग करून अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणा-यांवर खालील प्रमाण कारवाई केली.

कारवाई क्र. ०१: दिनांक १२/०३/२०२६ रोजी सावनेर पोलीस पेट्रोलींग करीत असतांना अंबीका चौकात एक संशयीत १० चक्का टिप्पर क्र. एम एच-२७/डी टी- १९१९ मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळुन आली. टिप्पर चा चालक नामे १) अश्पाक गौरअली पठाण, वय ५९ वर्ष, रा. वार्ड नं. ६, ता. वरूड, जि. अमरावती मिळुन आला. वाहन चालकाकडे असलेल्या रेती वाहतूकीच्या परवान्यापेक्षा जास्त तसेच क्षमतेपेक्षा जास्त रेती आढळुन आली. पोलीसांनी पंचासमक्ष १) १० चक्का टिप्पर क्र. एम एच-२७/डी टी- १९१९ किंमती १३,००,०००/- रूपये पारवान्यापेक्षा जास्त असलेली ०२ बास रेती किंमती १०,०००/- रूपये असा एकुण १३,१०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाई क्र. ०२ दिनांक १५/०३/२०२६ रोजी सावनेर पोलीस पेट्रोलींग करीत असतांना पोलीसांना पेट्रोलींग दरम्यान मोहपाकडे जाणारा सावनेर बायपास कोलार नदीचे पुलावर १) १२ चक्का टिप्पर क्र. एम एच-३४/बि.जी-१००४ २) १० चक्का टिप्पर क्र. एम एच-४०/सि.एम-८५३९ ३) ट्रक क्र. एम एच-४०/सि डी-०५९७ हे तिन वाहन मिळून आल्याने वाहन थांबवुन वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये रेती आढळून आली. टिप्पर क्र. १) चा चालक नामे सौरभ हरीदास सांगोळे, वय ३० वर्ष, रा. मंगसा ता. सावनेर, जि. नागपूर असे सांगितले. टिप्पर क्र. २) चा चालक नामे निलेश जिवनलाल उईके, वय ३१ वर्ष, रा. वडचिचोली ठाना, ता. जि. पांढुर्णा मध्यप्रदेश ३) ट्रक क्र. ३) चा चालक नामे सचिन विठ्ठल पटले, वय २८ वर्ष, रा. वार्ड क्र. १, किल्लापुरा खापा, ता. सावनेर, जि. नागपूर असे सांगितले. पोलीसांनी तिन्ही वाहनाची तपासणी केली असता रेती वाहतूकीच्या परवान्यापेक्षा जास्त तसेच क्षमतेपेक्षा जास्त रेती आढळुन आली. पोलीसांनी पंचासमक्ष वर नमुद तिन्ही वाहने १) १२ चक्का टिप्पर क्र. एम एच-३४/बि.जी-१००४ किंमती १८,००,०००/- रूपये २) १० चक्का टिप्पर क्र. एम एच-४०/सि.एम-८५३९ किंमती १३,००,०००/- रूपये ३) ट्रक क्र. एम एच-४०/सि डी-०५९७ किंमती १३,००,०००/- रूपये आणि तिन्ही वाहनातील पारवान्यापेक्षा जास्त असलेली ६.४४ ब्रास रेती असा एकुण ४४,३२,५००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दोन्ही कारवाईत एकुण ८.४४ ब्रास रेती आणि ४ वाहने असा एकुण ५७,४२,५००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद आरोपीतांविरूध्द पोस्टे सावनेर येथे कलम ३०३ (२), ३(५) भा.न्या. सं सहकलम ४७ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अन्वये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.