spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सट्टापट्टी चालविणाऱ्या आरोपीतांविरूद्ध गुन्हा नोंद

कोंढाळी :- रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कोंढाळी शहरातील बाजार चौक परिसरात एका पडक्या दुकानात सार्वजनिक ठिकाणी काही इसम हे लोकांकडुन पैसे घेवुन सट्टापट्टीचे आकडे लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहचले असता आरोपी नामे १) गजानन चांगदेवराव धर्मे, वय ५० वर्ष, रा. शनिचरापेठ, व्यास कॉलेज जवळ कोंढाळी, ता. काटोल, जि. नागपूर हा कागदावर आकडे लिहुन सट्टापट्टी चालवित असतांना मिळुन आला. तसेच आरोपी क्र. २) विनोद सुभाष जयपुरकर, वय ४८ वर्ष, रा. लेंडीपुरा कोंढाळी, जि. नागपूर हा सदर ठिकाणी सट्टा लावण्याकरीता आला असल्याचे सांगितले. आरोपी क्र. १) याला अधिक विचारपुस केली असता आरोपी कं३) फहीम शेख, रा. बाजार चौक, कोंढाळी याच्या सांगण्यावरून तो सट्टापट्टी चालवित माहीती प्राप्त झाली. पोलीसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम १०,४६०/- रूपये, सट्टापट्टीचे लिहण्याकरीता वापरलेले साहित्य, वेगवेगळया कंपनीचे मोबाईल किंमती ११,०००/- रूपये असा एकुण २१,४६५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद आरोपी कं १) गजानन चांगदेवराव धर्मे, वय ५० वर्ष, रा. शनिचरापेठ, व्यास कॉलेज जवळ कोंढाळी, ता. काटोल, जि. नागपूर २) विनोद सुभाष जयपुरकर, वय ४८ वर्ष, रा. लेंडीपुरा कोंढाळी, जि. नागपूर ३) फहीम शेख, रा. बाजार चौक, कोंढाळी यांच्या विरूद्ध कलम १२ अ महाराष्ट्र जुगार अधिनियम सहकलम ४९ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.