नागपुर :- नागपुर ग्रामीण जिल्हयात रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलीसांनी अवैधरित्या दारू बाळगुन विकी करणाऱ्यांवर छापा टाकुन मोहाफुल दारू, देशी दारू तसेच वाहन, इतर साहित्य असा एकुण ७७,८४०/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये एकुण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस स्टेशन उमरेड येथे महिला आरोपी हिचे वर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन पाचगाव येथे आरोपी नामे किशोर जिवन टेकाम, वय ७० वर्ष, रा. उन्द्री, ता. उमरेड, जि. नागपुर याचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन वडोदा येथे आरोपी नामे शेखर रामु मोराडे, वय ४५ वर्ष, रा. वडोदा यांचेवर ०१ गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन देवलापार येथे आरोपी नामे कैलास शामलाल आत्राम, वय ४५ वर्षे, रा. वरघाट, ता. रामटेक, जि. नागपुर याचेवर एक गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन अरोली येथे आरोपी नामे १) दिपांशु विजय मेश्राम, वय २९ वर्ष, रा. नवेगाव २) आकाश विनोदकुमार जयस्वाल, वय ४० वर्षे, रा. पारशिवनी ३) शेखर समरित, वय २१ वर्षे, रा. डोगरगाव, ता. माहाडी, जि. भंडारा याचे वर एक गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन बेला येथे आरोपी नामे १) ईद्रकुमार रेखराज चंद्राकार, वय ३७ वर्षे, रा. बोदरी दादर मुनगामेर महासमुंद, छत्तीसगढ़ ह. मू. खालसा ढाबा चिमनाझरी २) अविनाश प्रमोद मौसकर, वय ३६ वर्षे, रा. पिपरा, ता. उमरेड, जि. नागपुर ३) रामगोपाल मायाबाबा मोरघरे, वय ४५ वर्षे, रा. खुर्मापार, ता. जि. नागपुर ४) संजय राजेश्वर डोये, वय ५५ वर्षे, रा. हिवरा हिवरी, ता. उमरेड, ता. जि. नागपुर याचे वर प्रत्येकी एक असे ०४ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन बुट्टीबोरी येथे आरोपी नामे अनिल प्रकाश शर्मा, वय ४२ वर्ष, रा. बोरखेडी फाटक, तालुका जिल्हा, नागपुर याचे वर एक गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन केळवद येथे महिला आरोपी हिचे वर एक गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन खापा येथे आरोपी नामे १) मधुकर शेषराव वानखेडे, वय ६५ वर्ष, रा. वाघोली २) प्रल्हाद नागोजी परतेकी, वय २४ वर्ष, रा. सोनपुर, ता. सावनेर, जि. नागपूर याचे वर प्रत्येकी एक गुन्हा असे ०२ गुन्हे नोंद, पोलीस स्टेशन सावनेर येथे आरोपी नामे १) कैलास माणिकरावजी राऊत, वय ४० वर्ष, रा. खुरजगाव सावनेर २) प्रविण शालीकराव गायधने, वय ३८ वर्ष, रा. सावनेर याचे वर एक गुन्हा नोंद, तसेच ३) कमलेश रामसजीवन कैथल, वय ४६ वर्ष, रा. वाघोडा सावनेर याचे वर एक गुन्हा नोंद, पोलीस स्टेशन काटोल येथे आरोपी नामे १) श्रावन रमेशराव तेलते, वय ४३ वर्ष, रा. गळपुरा चौक, काटोल २) प्रकाशकौर चतुरसिंग भादा, वय ७२ वर्ष, रा. अर्जुन नगर, काटोल ३) महिला आरोपी याचे वर प्रत्येकी एक गुन्हा असे ०३ गुन्हे नोंद, अशा एकुण २१ आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये १८ गुन्हे दाखल केले आहे.







