spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विना परवाना रेती वाहतूक करणाऱ्या तस्करबाजास अटक

कामठी :- स्थानिक वडोदा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या भंडा रा नागपूर मार्गावरील झुल्लर फाटा येथून ट्रक क्र एम एच 40 सी टी 9736 ने अवैधरित्या विना परवाना 10 ब्रास रेती वाहून नेत असता पोलिसांनी सदर ट्रक थांबवून वाहनांची पाहणी करून वाहन चालकास रेती वाहतुकीच्या परवान्या बाबत विचारपूस केली असता कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सदर ट्रक किमती 45 लक्ष रुपये व ट्रक मध्ये भरून असलेली अवैध 10 ब्रास वाळू किमती 55 हजार रुपये असा एकूण 45 लक्ष 55 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी ट्रक चालक नकुल सीताराम कनोजिया वय 24 वर्षे रा मांनकापूर नागपूर व ट्रक मालक विरुद्ध वडोदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही यशस्वी कारवाई ठाणेदार गदाडे ,पोलीस कर्मचारी प्रणय बानफार ,दीपक दरोडे,नितीनसार्वे,अतुल निंबारते आदींनी केली.

Popular Articles