spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे उद्या विराट हिंदू संमेलन

किशोर साहू, मौदा :- सनातन हिंदू धर्माच्या गौरवशाली परंपरेचा वारसा जपत, हिंदू समाजात एकात्मता, संस्कार आणि सामाजिक समरसता दृढ करण्याच्या पवित्र उद्देशाने चाचेर येथील बस स्टॉप जवळील रावण दहन मैदानात आयोजक सकल हिंदू समाजातर्फे गुरुवार (ता. 26 मार्च)ला दुपारी तीन ते आठ वाजेपर्यंत भव्य हिंदू संम्मेलन चे आयोजन करण्यात आले आहे.

गौपूजन, कलश यात्रा, भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्त्यांचे भाषण, भारत मातेची आरती व त्यानंतर महाप्रसादाने समारोप होणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ईजनी (धर्मापुरी) सुरसंगम, सिद्ध आश्रम येथील श्री महंत श्री छोटे बालकदास महानत्यागी, प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील विश्व हिंदू परिषद चे महानगर मंत्री अमोल ठाकरे, प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महास्थवीर भदंत रेवत बौधी, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय रामटेक सेवा केंद्र येथील ब्रह्मकुमारी ललिता दीदी ,महानुभाव पंथाचे खुशाल कापसे, परमात्मा एक सेवक संस्था रामटेक अध्यक्ष रामदास मथुरे, मार्गदर्शक जयराम महाजन सह गावातील, परिसरातील ,तालुक्यातील, जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहे.

हे संम्मेलन केवळ एक कार्यक्रम नसून हिंदूंच्या विचारांना, संस्कारांना, शक्तीला आणि संकल्पला योग्य दिशा देणारे एक सशक्त व्यासपीठ आहे. त्यामुळे या हिंदू संम्मेलनाला समस्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक सकल हिंदू समाजा तर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles