धर्मराज ला शिक्षणाधिकारी योजना यांची भेट

0
37

– निरक्षर साक्षरता अभियान अंतर्गत परीक्षा, साहेब म्हणयं… शिका ना अ आ ई….

कन्हान :- चेहर्‍यावर सुरकुत्या…. अन…. थरथरत्या हातात पेन अन कागद काहिसे असेच चित्र…. आज साक्षरता परिक्षा वर्गातील प्रवेश करताना दिसले….. साहेब म्हणयं…. शिका ना अ आ ई…….

येथील धर्मराज प्राथमिक शाळा व धर्मराज विद्यालय कांद्री-कन्हान येथे रविवार (दि. २९) शिक्षणा धिकारी (योजना) आशिष चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकाने साक्षरता परीक्षा वर्गाची पाहणी केली. २०२७ पर्यंत संपुर्ण साक्षरतेचा टप्पा गाठायचा आहे. त्या अनुषंगाने गावागावात शिक्षकांकडे निरक्षर व्यक्तींना कमाल ज्ञान देउन साक्षर करायचे आहे. धर्मराज प्राथमिक शाळा येथे ८ तर धर्मराज विद्यालय येथे १० असाक्षरां ची नोंद आहे. या सर्व विद्यार्थ्यांची राज्य पातळीवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या साक्षर वर्ग परीक्षेत १८ असाक्षर विद्यार्थी उपस्थित होते.

शिक्षणाधिकारी (योजना) आशिष चव्हाण, सहाय्यक योजना अधिकारी नितीन वाघमारे, साधन व्यक्ती नितीन कवडे, प्राथमिक मुख्याध्यापक खिमेश बढिये, माध्यमिक मुख्याध्यापक प्रकाश डुकरे यांनी उपस्थित असाक्षर परीक्षा वर्गाची पाहणी करून उपस्थितांशी संवाद साधला. प्रत्येक व्यक्ती शिकला पाहिजे असे सांगत संपुर्ण शिक्षित भारत निर्माण करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) मा. आशिष चव्हाण यांनी केले. मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी असाक्षर वर्ग, नियोजन या संदर्भातील माहिती दिली.

यावेळी असाक्षर परिक्षेचे कामकाज पाहणारे उपमुख्याध्यापक मोहन भेलकर, पर्यवेक्षक राजु सिंग राठोड, चित्रलेखा धानफोले, गणेश खोब्रागडे, भिमराव शिंदेमेश्राम, गंगराज यांच्यासह इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.