सामाजिक उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा – सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष पानसे

0
37

कामठी :- तरुणांनी ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाचे उत्तरदायित्व पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष पानसे यांनी ॲग्रीकोज वेल्फेअर सोसायटी नागपूरच्या वतीने कडोली ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद उत्तर उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित विविध साहित्य वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले ॲग्रीकोज वेल्फेअर सोसायटी नागपूरच्या वतीने प्रतिवर्षानुसार ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध साहित्य वाटप करण्याचे उपक्रम अनेक वर्षापासून राबवित असून यावर्षी सुद्धा कडोली ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत साहित्य वाटप कार्यक्रमाची सुरुवात सरपंच लक्ष्मण करारे यांचे हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक सुभाष पानसे, आकाशवाणीचे अधिकारी राजेश कळमकर, महाराष्ट्र ऍग्रो इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे रिजनल मॅनेजर विजय हुसुकले, सेवानिवृत्त पोलीस उपयुक्त निलेश राऊत ,सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक रामदास ठाकरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले ,माजी सरपंच प्रांजल वाघ, पोलीस पाटील उमेश वानखेडे उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थी हितेश अहिरवार याला पंचवीस हजार रुपयांचा धनादेश, उष्णवी शेखर सेलोटे यांना 15हजार रुपयाचा धनादेश ,श्रावणी महादेव गोडसेला सात हजार रुपयाचा धनादेश तर यशश्री सुनील गोदे ,अक्षरा देवेंद्र नंदागवळी ,तनुश्री संदीप वनवे ,रोहिणी रामा सतीकोसरे या विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या , नोटबुक, कंपास बॉक्स ,टिफिन बॉक्स, पाणी बॉटल विविध साहित्याचे वितरण करण्यात आले विविध साहित्य वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त निलेश राऊत म्हणाले ,स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी विपरीत परिस्थितीवर मात करून कठोर परिश्रम व सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उत्तम यश संपादन करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक सरपंच लक्ष्मण करारे यांनी केले संचालन व आभार प्रदर्शन ग्राम विकास अधिकारी उदय चांदूरकर यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.