किशोर साहू, मौदा : दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवार (ता.26 मार्च ) ला गट ग्रामपंचायत तोंडली अंतर्गत येत असलेल्या सुकळी येथे भव्य जत्रे चे आयोजन करण्यात आले होते. तर तोंडली येथे बहुउद्देशीय नाट्य मंडळ तर्फे तीन अंकी नाटक ‘अंधे लंगडे की कहानी उर्फ कस्मासिंग डाकू’चे आयोजन करण्यात आले होते. नाटकाच्या उद्घाटनाला भाजपा तालुकाध्यक्ष मुकेश अग्रवाल, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत भुरे, कोदामेंढी सर्कल क्लस्टर प्रमुख भगवान बावनकुळे , पोलीस स्टेशन अरोली चे पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत,माजी उपसभापती अशोक हटवार, माजी सरपंच काटी रवींद्र बाभरे, तोंडली सरपंचा दर्शना बागडे, उपसरपंच रामपाल धांडे, गोपाल गिरमेकर सह गावातील व परिसरातील मान्यवर उपस्थित होते.

सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन माजी उपसरपंच सुरेंद्र बाभरे यांनी केले.
याप्रसंगी शाळा समिती तोंडली अध्यक्ष मधुकर तिजारे,राजेश सपाटे ,श्रावण ईश्वरकर , दामोदर धांडे, राजू शेंडे, रामकृष्ण तिजारे, दिगंबर मते, भाऊराव तिजारे, तुळशीदास पाणबुडे, प्रमोद बागडे, अमोल धोत्रे, संजय शेंडे , राजेंद्र नागपुरे, शिवशंकर नागपुरे , शरद धांडे , लखन तिजारे , अंकुश तिजारे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जत्रेनिमित्त प्रसिद्ध भव्य हनुमान मंदिर परिसरात माजी जि प सदस्य योगेश देशमुख मित्र परिवारातर्फे भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



