कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या घोरपड पावनगाव रोडवरील राजा यादव यांच्या दादाजी डेअरी अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्यावर धाड घालण्यात नवीन कामठी पोलिसांना यश प्राप्त झाले असून या धाडीतून 8 जुगारी ताब्यात घेत त्याविरुद्ध कलम 4,5 महाराष्ट्र जुगार बंदी कायद्या अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या धाडीतून घटनास्थळाहुन 52 तास पत्ते व नगदी 35830 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कार्यवाही काल सायंकाळी 6 च्या दरम्यान करण्यात आली.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या जुगाऱ्यात महेश दावाणी वय 38 वर्षे ,कपिल यादव वय 40 वर्षे,कामेश्वर श्रीवास्तव वय 52 वर्षे,योगेश यादव वय 46 वर्षे,सुदर्शन पाटील वय 35 वर्षे,सुमित महल्ले वय 23 वर्षे ,सुशील बिचपुरीया वय 57 वर्षे ,शेख गुलाब शेख अनवर वय 45 वर्षे सर्व रा कामठी या सर्व आरोपीला ताब्यात घेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून सूचना पत्राद्वारे सोडण्यात आले तसेच जागेचा मालक राजा यादव वर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला मात्र सदर आरोपीने घटनास्थळाहूंन पळ काढण्यात यश गाठले.ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनार्थ एपीआय सचिन यादव व सहकारी पोलिसांनी केली.








