spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कन्हान नदीत बुडाल्याने १४ वर्षीय मुलाचा मुत्यु

कन्हान :- नदीच्या पिपरी घाटाकडील नदी पात्रात आंघोळी ला गेलेल्या मित्रापैकी लक्की बोपचे या १४ वर्षीय मुलाचा बुडल्याने त्यास कामठी ला उपचारार्थ नेताना रस्त्यातच त्याचा मुत्यु झाला.

सोमवार (दि.३०) मार्च ला काही मित्र आंघोळी करिता गेले असता सायंकाळी ५ वाजता दरम्यान कन्हान शहराला पाणी पुरवठा योजनेच्या ढोल्या कडील पिपरी घाटाच्या कन्हान नदीच्या पात्रात दोन मुले बुडु लागल्याचे पाहुन नदी पात्रावाडी मध्ये असलेल्या भोई समाजाच्या व्यकती ने धावुन एका वाचविले तर दुसरा शिवनगर कन्हान येथील इयत्ता ८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या लक्की शंकर बोपचे वय १४ वर्ष या मुलास नदी पात्रातुन बाहेर काढुन कामठी येथील रूग्णालयात नेताना रस्त्यातच च्या मुत्यु झाल्याने आंघोळ करताना पाण्यात बुडुन मुत्यु झाला. माहिती मिळताच कन्हान व कामठी पोलीस पोहचुन पंचनामा करून ग्रामिण उपजिल्हा रूग्णालय कामठी येथे मृत देह शवविच्छेदन करिता शीत गृहात ठेवण्यात आला. कन्हान पोलीसानी वडील शंकर बोपचे यांचे तोडी बयाणा वरून मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आहे.

Popular Articles