spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे जलजीवन मिशनचा बट्ट्याबोळ – शैलेश कोपरकर

किशोर साहू, मौदा :- मौदा तालुक्यातील ग्रामपंचायत चाचेर येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अनेक चांगले, चांगले सिमेंटचे रस्ते फोडून ठेवले, परंतु कामे पूर्ण केले नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी कार्यकारी अभियंता यांच्याकडे पाठपुरावा केला असता निधी नसल्यामुळे कामे ठेकेदार करत नाही,असे उत्तर त्यांच्याकडून देण्यात येत आहे. गावामध्ये पाण्याची फार मोठी समस्या तयार झाली आहे. चांगले रस्ते फोडले त्यामुळे लोकांना वयवाटीचा त्रास होत आहे. त्यामुळे जल जीवन मिशन योजनेच्या भट्ट्याबोळ झाल्याचा आरोप चाचेर ग्रा प चे ग्रा प सदस्य तथा चाचेर निमखेडा जि प सर्कलचे काँग्रेसचे भावी उमेदवार शैलेश कोपरकर यांनी केले आहे. लवकरात लवकर या कामाला निधी उपलब्ध करून काम लवकर पूर्ण करण्यात यावे जेणेकरून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी देण्यात ग्रामपंचायत प्रशासनाला अडचणी निर्माण होणार नाही, अशी अपेक्षाही कोपरकर यांनी व्यक्त केली आहे.

Popular Articles