spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

वरठी पोलिसांची अवैध रेती तस्करीवर मोठी कारवाई; १५ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

– बोरगाव खुर्द येथील आरोपीवर गुन्हा दाखल; दाभा चेक पोस्टवरील कारवाई

इनसाइडर न्युज टुडे, प्रतिनिधी भंडारा वरठी :- वरठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजा दाभा चेक येथे सापळा रचून रेतीची चोरटी वाहतूक करणारा एक टिप्पर पकडण्यात आला असून, एकूण १५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरठी पोलीस स्टेशनचे पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मौजा दाभा चेक येथे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसमक्ष संशयास्पद टिप्पर (क्रमांक एम.एच. ३६ ए.एल. २९०७) थांबवून त्याची पाहणी केली. यावेळी टिप्परमध्ये अवैधरित्या साठवलेली ८ ब्रास रेती मिळून आली.

या कारवाईत पोलिसांनी ४८ हजार रुपये किमतीची ८ ब्रास रेती आणि अंदाजे १५ लाख रुपये किमतीचा टिप्पर, असा एकूण १५ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी मनीराम शीवराम भुरे (वय ४८ वर्षे, रा. बोरगाव खुर्द, ता. जि. भंडारा) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध वरठी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक २३४/२०२४ (BNS नुसार) कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वाघमारे व वरठी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरठी पोलीस करीत आहेत.

Popular Articles