spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी

इनसाइडर न्युज टुडे, प्रतिनिधी भंडारा :- किमान आधारभूत किंमत खरेदी योजना खरीप पणन हंगाम २०२५-२६ मध्ये धान खरेदी करीता शासनाचे BeAM पोर्टलवर ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु झालेली आहे. नोंदणी करण्याची मुदत दि.०१ एप्रिल २०२६ ते दि.३० एप्रिल २०२६ असुन सदर कालावधीमध्ये शेतकरी नोंदणी करावयाची आहे. तसेच ऑनलाईन नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची दि.०१ मे २०२६ ते ३० जून २०२६ या कालावधीत धान व भरडधान्य खरेदी पुर्ण करावयाची आहे.

तरी धान उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करण्यासाठी उपस्थित राहणेसह, चालू हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना ८ अ, अद्यावत बँकेचे पासबुक अथवा रह केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेवून तालुक्यातील जवळच्या पणन महासंघाच्या “अ” वर्ग व “ब” वर्ग सभासद संस्था असलेल्या संस्थेच्या धान खरेदी केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी रब्बी पणन हंगाम २०२५-२६ मध्ये धान विक्री करण्याकरिता आपल्या नावाची नोंदणी पूर्ण करावी व शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सावन कुमार जिल्हाधिकारी, भंडारा व सुधीर एस. पाटील, जिल्हा पणन अधिकारी, भंडारा यांनी केलेले आहे.”

Popular Articles