spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; एका महिलेची सुटका

दोन आरोपी अटक व मालका विरुद्ध गुन्हा दाखल

सचिन चौरसिया, रामटेक २३ :- किट्स कॉलेज रोडवरील हॉटेल किंग अँड लॉजवर गेल्या काही महिन्यापासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. पैशाचे अमिश दाखवून महिलेकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. पोलीस विभागाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून एका पीडित महिलेची सुटका केली आहे. लोकेश रामदास डहारे (३६) रा. शनिवारी वार्ड, रामटेक व विवेक विजय गुरूपंचाग (१९) रा. साटक, पारशिवनी लॉज चालक यांना अटक करण्यात आली आहे. आणि विशाल सोलंकी मालकाचे नावं असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या हाँटेलवर वेश्या व्यवसायाचा हा गोरख धंदा सुरू होता. त्याचा पर्दाफाश करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आले आहे. ही कारवाई रविवार (दि.२०) दुपारी ३.३० च्या सुमारास करण्यात आली.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत येथील किट्स कॉलेज रोडवरील किंग हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. संबंधित व्यक्ती महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत होता. त्यानुसार पोलिसांनी किंग हॉटेलवर रविवारी (दि.२०) दुपारी छापा मारून कारवाई केली. या कारवाईमध्ये हॉटेल चालक लोकेश डहारे (३६) व विवेक गुरूपंचाग (१९) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच हॉटेल मालक विशाल सोलंकी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिघेही आरोपी मिळून आर्थिक फायद्यासाठी महिलांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत होते. हॉटेल मधून तीन मोबाईल, १० हजार रुपये नगद असा २१ हजार १६० रुपयांच्या माल जप्त करण्यात आला आहे. पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायदा १९५६ च्या कलम ३, ४, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामटेक पोलीस करत आहेत


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.