टिमकी येथे शिव महापुराण कथा सप्ताह ज्ञान यज्ञाचे आयोजन

0
186

 

“आकाळी मृत्यू त्यालाच येतो जो चांडाळाचे कर्म करतो, पण जो महाकालाचा भक्त असतो, त्याला काळही काही करू शकत नाही.”

हिंगणा २३  : हनुमानजींच्या प्रेरणेतून श्री बाथ्री तेली समाजाच्या वतीने संकट मोचन हनुमान मंदिर, टिमकी बाजार, नागपूर येथे श्री शिव महापुराण कथा सप्ताह ज्ञान यज्ञाचे आयोजन रविवार, २० जुलै ते शनिवार, २७ जुलै २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या पवित्र कथांचे वाचन पं. रामनारायणजी पांडे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात रविवार रोजी सकाळी ७ वाजता गणेश पूजन व आरतीने झाली. सकाळी ९ वाजता सतीश पूरे यांच्या निवासस्थानाहून भव्य कलश यात्रा निघाली. संपूर्ण वसाहत प्रदक्षिणा करून ती कथा स्थळी पोहचली व त्यानंतर कलश पूजनाने प्रारंभ झाला. व्यासपीठाचे पूजन करून शिव पुराणातील महात्म्य, देवराज, चंचुला, विंदुग यांची कथा सांगण्यात आली.

या आठवड्यात दररोज शिवपूजन विधी, सृष्टी वर्णन, पापी गुणनिधी कथा, सती चरित्र, नारद चरित्र, दक्ष यांना शिवांचे उपदेश, शिव-पार्वती विवाह, कार्तिक व गणेश जन्म कथा, त्रिपुरासुर, जालंधर, हिरण्याक्ष, हिरण्यकश्यप वध, नंदीकेश्वर, भैरव, दुर्वासा, हनुमान, अश्वत्थामा, किरात कथा, शिवाच्या ज्योतिर्लिंगांचे वर्णन, शिवरात्री व्रत विधान, निषाद चरित्र, नरक वर्णन, एकादशी व्रत विधी, प्रलय वर्णन, पंचाक्षर मंत्र महिमा, गुरु दीक्षा विधी, हवन, पूर्णाहुती व आरती असे विविध अध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

या पवित्र सप्ताहाचे समारोप रविवार, २७ जुलै रोजी महाप्रसादाने होणार आहे. या सप्ताहाचे आयोजक सतीश हरिचंद पूरे व त्यांच्या परिवाराने सर्व भक्तांना कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.