मनसे नागपुर जिल्हा ग्रा. कार्यकारणी बैठक संपन्न

0
62

मनसे तालुका व शहर अध्यक्षाची निवड

कन्हान २३ : –  महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर जिल्हा ग्रामीण पक्षाची कार्यकारणी बैठक कन्हान शहरात आयोजित करून पारशिवनी तालुका, शहर, कन्हान, कांद्री शहर अध्यक्षाची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपुर जिल्हा ग्रामिण अध्यक्ष शेखरभाऊ टुडे यांचे अध्यक्षेत व नाग पुर जिल्हा उपाध्यक्ष रोशनभाऊ फुलझेले यांच्या उपस्थित बैठकीची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी माननिय राज साहेब ठाकरे यांच्या विचारानी प्रेरित होऊन अनेक युवकांनी मनसेत पक्ष प्रवेश केला. तदंतर सर्वानुमते पारशिवनी तालुका अध्यक्ष पदी प्रदीप मनगटे यांची निवड करून तालुका उपाध्यक्ष पदी आकाश बोरीकर, पारशिवनी शहर अध्यक्ष पदी शेखर केळवदे, कांदी शहर अध्यक्ष पदी शिवनारायन सिंग, कन्हान शहर आध्यक्ष पदी राहुल घाटे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी मनसे माजी पारशिव नी तालुका अध्यक्ष नरेन्द्र पांडे, तालुका उपाध्यक्ष विक्की नांदुरकर, रॉकी चवरे, संदीप मेश्राम, धनराज ढेंगळे, रूचित दाते, विनोद वाघधरे, निखिल सिंग, रोहीत कनोजिया आदीनी प्रामुख्याने उपस्थित राहुन निवड झालेल्या पदाधिका-यांचे अभिनंदन करून मनसे पक्ष वाढविण्यास शुभेच्छा दिल्या.