spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद, ११० दात्यांनी केले रक्तदान

कन्हान २३ : – भारतीय कोळसा खदान मजदुर संघाच्या ७० व्या स्थापना दिना निमित्त भारतीय कोळसा खदान मजदुर संघ द्वारे मंगळवार (दि.२२) जुलै रोजी गोंडेगाव उपक्षेत्रात रुग्णालय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गोंडेगाव उपप्रादेशिक व्यवस्थापक आर.बी.वर्मा यांच्या हस्ते भगवान विश्वकर्मा, भारत माता, दत्तोपंत ठेंगडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण करून रक्त दान शिबीर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हेडगेवार रक्तपेढी केंद्राचे डॉ.रघिवे सर, पूजा भांडारक र, काजल चाचणे, ओमप्रकाश बंडे, अनिल परमारे आदीच्या सहकार्याने एकुण ११० रक्तदात्यांनी रक्तदान करुन शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने रक्त दात्यां ना हेल्मेट वितरित करण्यात आले. यावेळी जेबीसीसी आय चे सदस्य जयंत आसोले, खाण व्यवस्थापक  के रघुवीर, कार्मिक व्यवस्थापक राजेश यादव, कल्या ण समिती सदस्य इलियास अहमद, निलम यादव, जय प्रकाश चंद्र, राजकुमार सूर्यवंशी, प्रकाश वायकर, संज य रंगारी, छत्रपाल वालके, नरेंद्र राजपुत, संजय राज पुत, ए. कात्यानी, फ्लोरा साजी, प्रकाश इचगुलवार, हितेश मुपीडवार, लहु रोकडे, संजय सिंग, बद्री तिवारी , नितेश रावतेल, सुरेंद्र ठाकरे सह सदस्य बहु संख्येने उपस्थित होते


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.