खापा, २३ : महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय, सिरोंजी (ता.सावनेर) येथे अभूतपूर्व अशी शिक्षक-पालक सभा (दि.19) ला पार पडली. शिक्षक-पालक समन्वयातून विद्यार्थी व शाळा गुणवत्ता विकास, शासनाच्या विविध योजनांची माहिती, शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम इत्यादींची माहिती पालकांना व्हावी या हेतूने शाळांमध्ये पालक सभांचे आयोजन होत असते. अशा सभांना ग्रामीण भागात पालकांची उपस्थिती नगण्य असते. परंतु यावेळी विद्यालयात पालकांची उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त झाल्याने शिक्षकांचा उत्साह वाढला. प्राचार्य संदीप भोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकांनी राबविलेल्या नवोक्रमांचे हे फलित असल्याची भावना उपस्थित पालकांनी व्यक्त केली व भविष्यात वेळोवेळी पाहिजे असलेले सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विविध समिती सचिव शिक्षकांनी समितीच्या कामकाजाची माहिती व महत्त्व उपस्थितांना पटवून दिले व चर्चा आयोजित केली.
सभाध्यक्ष प्राचार्य संदीप भोंडे यांच्यासह शाळा समन्वय समितीचे सदस्य ओमेश भिमटे, रामराव उईके, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष दिनेश उईके, शा. व्य. समिती अध्यक्ष किसना सहारे, विद्यार्थी सुरक्षा समिती अध्यक्षा गीता बाजणघाटे, माता-पालक संघ अध्यक्षा रेखा लोहितकर, सखी-सावित्री संघ अध्यक्ष बंडू बघमार मंचावर उपस्थित होते. शेकडोच्या संख्येने उपस्थित असलेल्या पालक सभेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. विजय काळमेघ, ज्ञानेश दळवी, योगिता बुऱ्हाण, जेष्ठ शिक्षक दुर्गेश्वर चौधरी, रामकृष्ण टेकाडे, दिनेश हजारे, दीपक नारे, शिक्षिका बी. एन. पर्बत, पुजा दहीकर शिक्षकेत्तर कर्मचारी शुभम चटकवार, मारोती सोमकुवर, कुंदा बाजणघाटे यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन दिनेश हजारे तर आभार प्रदर्शन पुजा दहीकर यांनी पार पाडले




