चंद्रपूर :- सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट) द्वारा संचलित राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, रिसर्च अँड टेक्नॉलॉजी, चंद्रपूर येथे एक दिवसीय मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंट कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी वेब व मोबाईल तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान घेत सिद्धांतासोबतच प्रात्यक्षिक अनुभवही मिळवला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविक व स्वागतपर भाषणाने झाली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि करिअरच्या विविध संधींबाबत माहिती मिळाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेले सौरभ चक्रवर्ती यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. अनुभवी फुल-स्टॅक इंजिनिअर म्हणून त्यांनी जावा, स्प्रिंग बूट आणि फ्लटर या तंत्रज्ञानातील आपला अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केला. त्यांनी मोबाईल अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटमधील गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगत प्रात्यक्षिक सत्राद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सत्रामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाची उपयुक्त माहिती मिळाली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी CSE (Data Science) विभागाचे डॉ. देवश्री कोडगिरे, प्रा. भाग्यश्री करमरकर, प्रा. पल्लवी बालमवार, प्रा. प्रेरणा पाल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास प्राध्यापकवृंद व विद्यार्थ्यांची उपस्थिती लाभली.