हज यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घ्या – विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बिदरी यांच्या सूचना

0
49

– हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेचा आढावा

–  हज यात्रेकरूंना स्मार्ट वॉच करून देणार

– हज यात्रेकरूंचे पहिले विमान 24 एप्रिल ला रवाना होणार

नागपूर :- हज यात्रेसाठी नागपूर येथून जाणाऱ्या यात्रेकरुणा राज्य हज समितीमार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून हजयात्रे करून ची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बेदरी यांनी आज दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात हज यात्रे संदर्भात विभागीय आयुक्त याच्या अध्यक्षतेतआढावा घेण्यात आला, यावेळी मार्गदर्शन करताना बिद्री बोलत होत्या.

डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दिनांक 24 एप्रिल पासून हज यात्रेला सुरुवात होत आहे. या मध्ये नागपूर व परिसरातील 1 हजार 700 यात्रेकरू चा समावेश राहणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळावरून छत्तीसगड , मध्य प्रदेश आदी राज्यातील सुमारे 19 हजार 335 हाज यात्रे करू हाज साठी रवा रवाना होणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दररोज विशेष विमानाची यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे ही व्यवस्था राज्य हाच समितीमार्फत करण्यात येणार आहे.

हज यात्रेसाठी रवाना होणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूंना स्मार्ट वॉच देण्यात येणार असून या वॉचमुळे हज यात्रे प्रसंगी यात्रेकरूंची नेमकी उपस्थिती, काही वैद्यकीय मदत आवश्यक असल्यास त्याबाबतची माहिती तसेच यात्रेदरम्यान होणारी गैरसोय या संदर्भातील माहिती यात्रे करू स्मार्ट वॉच मधील एक विशिष्ट सुविधेद्वारे नियंत्रण कक्षाकडे कळू शकेल. या व्यवस्थेमुळे यात्रेकरूंची कुठलीही गैरसोय होणार नाही अशी माहिती विभागीय आयुक्त बिदरी यांनी बैठकीत दिली व यात्रे करून ना दिल्या जाणाऱ्या किटमध्ये या स्मार्ट वॉच चा समावेश राहणार आहे. हज यात्रेसाठी रवाना होताना प्रत्येक यात्रेकरूला लसीकरण करणे आवश्यक आहे त्यासाठी हज कमिटीतर्फे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विषयक काही अडचणी असल्यास त्याबद्दलही आवश्यक औषध सोबत ठेवण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नागपूर सह बाहेरून आलेल्या प्रत्येक हज यात्रेकरू साठी सुविधा राहणार असून त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्यात यावे अशी सूचना करण्यात आली. विदर्भासह बाहेरून आलेल्या हज यात्रे करून ना रेल्वेची सुविधा उपलब्ध रहावी यासंदर्भात रेल्वेच्या विभागीय नियंत्रकाकडे आरक्षणाबाबत कळविण्यात आले असल्याचे बैठकीत अतिरिक्त आयुक्त तेजूसिंग पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य हज समितीच्या विशेष अधिकारी खदीच्या नाईकवाडे हजयात्रे करून च्या सुविधांसंदर्भात समन्वयक आहेत,त्यानुसार आवश्यक सुविधा बद्दल नियोजन करत आहेत.

हज यात्रे करूनी शासनाला सहकार्य करावे असे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

या बैठकीस नागपुरी विभागाचे अतिरिक्त आयुक्त तेजूसिंग पवार, अतिरिक्त महापालिका आयुक्त अंकित हज समितीचे कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, राज्य हज समितीच्या खादीजा नाईकवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, परिमंडळ क्रमांक तीन चे पोलीस उपायुक्त राहुल मदने नागपूर सुधार प्रण्यास च्या महा व्यवस्थापक प्रियदर्शनी बोरकर महापालिकेचे राजेश भगत यांच्यासह बीएसएनएल रेल्वे मिहान इंडिया लिमिटेड चे यशवंत सराटकर आदी बैठकीत उपस्थित होते.