कामठी :- राज्याचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झालेल्या बैठकीत मान्सून उशिरा लागणार असून उन्हाळा जास्त प्रमाणात तापणार आहे अश्या परिस्थितीत पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते तेव्हा नागरिकांना दर्जेदार व अखंड पाणीपूरवठा व्हावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून दुरुस्त्या, देखभाल,व नियोजनाकडे लक्ष पुरवावे असे निर्देश कामठी नगर परिषद प्रशासनाला केले यावर मुख्याधिकारी विनोद जाधव व नगराध्यक्ष यांनी नागरिकांना पाण्याची गैरसोय होणार नसून त्यांना पाण्याची नियमित व दर्जेदार पाणीपुरवठा करण्यात येईल तसेच नागरिकाना नियमित व पुरेश्या प्रमाणात पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याचे सांगितले त्यानुसार कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारी विनोद जाधव, नगराध्यक्ष अजय अग्रवाल ,माजी नगराध्यक्ष निरज यादव, पाणीपुरवठा सभापती दिलीप बांडेबूचे,नगरसेवक नियाज कुरेशी ,अभियंता वीरेंद्र ढोके यांनी जुनी कामठी येथील कन्हान नदीवरील ज्याकवेल,भीमनगर कामठी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करित पुढील नियोजन उपायययोजना वर भर देण्यात आले.
या प्रत्यक्ष पाहणी नंतर पाणीउपसा,शुद्धीकरण प्रक्रिया,यंत्रणा कार्यस्थिती तसेच उन्हाळ्यातील पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना चा आढावा घेण्यात आला. तर कामठी नगर परिषद नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असून नागरिकांना नियमित व दर्जेदार पाणीपूरवठा सुनिश्चित करण्यासाठी कामठी नगर परिषद प्रशासन सातत्याने प्रयत्नशील असल्याचे मत मुख्यअधिकारि विनोद जाधव व नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी व्यक्त केले.



