-एआयसीसी ठरवणार कांग्रेस चा जिल्हाध्यक्ष व कामठी चा शहराध्यक्ष
कामठी :- संघटन सृजन च्या माध्यमातून कांग्रेस तळागळातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचत असून या अभियानाच्या माध्यमातून नवीन व जुन्या कार्यकर्त्यांची मोट बांधणार असल्याचे मौलिक प्रतिपादन हरियाणा चे माजी आमदार राव दान सिंह यांनी कामठी शहर कांग्रेस कमिटी कार्यालयात व्यक्त केले.कांग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष,तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष हा आता कार्यकर्त्यांच्या मनातील राहणार असून सर्वांची मते जाणून घेतल्या नंतरच एआयसीसी जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष ठरवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच उपस्थित असलेले कांग्रेच चे महाराष्ट्र प्रदेश निरीक्षक शिवा राव यांनी कांग्रेस ची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवणारे तरुण नेतृत्व कांग्रेस मध्ये सक्रिय करण्यासाठी हे नवनिर्माण अभियान राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
पुढे म्हणाले की कांग्रेस ही एक विचारधारा आहे.मागील काही वर्षांपासून तिला काहीशी उतरती कळा लागली आहे त्यामुळे संघटन सृजन अभियानातून नवीन युवा कार्यकर्ते जोडणे,ज्या होतकरू कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही अश्याना संधी उपलब्ध करून देणे अश्या प्रकारचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.या अभियानात प्रत्येक विभागात जाऊन तेथील स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मतं ऐकून घेणे आणि या अहवालाच्या आधारावर नवीन जिल्हाध्यक्ष व त्यांच्या टीमची अखिल भारतीय कांग्रेस कमिटी च्या मार्फत नियुक्त करणे असा हेतू आहे.याप्रसंगी माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर,अवंतिका लेकुरवाडे, अनुराग भोयर, काशीनाथ प्रधान, नाना कंभाले,शकुर नागाणी , धीरज यादव, आदी उपस्थित होते.
निरीक्षकांनी घेतलेल्या प्रत्यक्ष मुलाखतीत जिल्हाध्यक्ष साठी कांग्रेस चे सुरेश भोयर तसेच विद्यमान जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी नावे समोर आली तर शहर अध्यक्ष पदासाठी काशिनाथ प्रधान, सुमित गेडाम, धीरज यादव, सुनील वाघमारे आदीची नावे समोर आली आहेत.



